23rd January In History Birth of Netaji Subhash Chandra Bose and Balasaheb Thackeray Death of Ram Ganesh Gadkari today in history detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. आजच्याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. तसेच अयोध्येचा राजा हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला. आजच्याच दिवशी नाटककार राम गणेश गडकरी यांचे निधन झाले. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

1897 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म

स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांची आज जयंती आहे. नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला. त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा केला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा, बंगाल विभागात झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस हे व्यवसायाने वकील होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या. नेताजी यांचे प्राथमिक शिक्षण कटक येथील रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांचे पुढील शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले. यानंतर त्यांच्या पालकांनी बोस यांना भारतीय नागरी सेवेची तयारी करण्यासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पाठवले. नेताजींनी 1920 मध्ये इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित चळवळींमध्ये सहभागी होते.

1919 : नाटककार, कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन

राम गणेश गडकरी  हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ ही चार पूर्ण नाटके लिहीली. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते. विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत. गडकरींचा जन्म 26 मे  1885 रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. राम गणेश गडकरी यांना देखील 34 वर्षांचे आयुष्य लाभले. 23 जानेवारी 1919 रोजी त्यांचा मृत्यू झाला.  

1926:  बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे या वादळाचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1955 साली बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात एक व्यंगचित्रकार म्हणून केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे. शिवसेनेने 1984 साली भाजपसोबत युती केली. त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपच्या मदतीने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली. 1989 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाच्या हिताच्या आणि अधिकाराच्या गोष्टी मांडल्या. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघी मुंबई स्तब्ध झाली.

1932 : अयोध्येचा राजा हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित

अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट होता. 1932 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.  शांताराम राजाराम वनकुद्रे दिग्दर्शित हा चित्रपट राजा हरिश्चंद्र आणि ऋषी विश्वामित्र यांनी केलेल्या त्याच्या परीक्षणाच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. ज्याचे वर्णन वाल्मिकीच्या महाकाव्या, रामायणात केले आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये पुनर्निर्मिती करण्यात आला होता. तो भारतीय सिनेमाचा पहिला डबल व्हर्जन टॉकी बनला, लेखक इस्माईल फारोघ यांनी हिंदी संवाद लिहिले, तर पटकथा लेखक एनव्ही कुलकर्णी यांनी मराठी संवाद लिहिले. 23 जानेवारी 1932 मध्ये हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. 

1977 : इंदिरा गांधींच्या विरोधात जनता पक्षाची स्थापना (Janata Party)

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीनंतर (1975-1976) जनसंघासह भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचे विलीनीकरण करून ‘जनता पक्ष’ हा नवा पक्ष स्थापन करण्यात आला. जनता पक्ष 1977 ते 1980 पर्यंत केंद्रात सत्तेत होती. 1980 मध्ये अंतर्गत मतभेदांमुळे जनता पक्ष फुटला.

इतर महत्वाच्या  घडामोडी

1915: उद्योगपती कमलनयन बजाज यांचा जन्मदिन 
1920: हवाई वाहतूक आणि हवाई टपाल सेवेची सुरुवात.
1930: साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते असलेले डेरेक वॉलकोट यांचा जन्म.
1973: अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम शांतता कराराची घोषणा केली आणि यासह अमेरिकेने लढलेले सर्वात प्रदीर्घ युद्ध संपले. 27 जानेवारीपासून युद्धविराम लागू झाला.
2002: अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांचे पाकिस्तानमधील कराची येथून अपहरण करण्यात आले. नंतर त्यांची हत्या करण्यात आली.
2010: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांची जयंती 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts