Manoj Jarange Wax statue in Pune Manoj Jarange Statue in Wax Museum Maratha Reservation Mumbai Rally marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Statue : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या सात महिन्यापासून लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) चर्चेत आले असून, त्यांच्या आंदोलनाची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहचली आहे. आंतरवालीमध्ये झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर जरांगे यांचे आंदोलन अधिक चर्चेत आले. दरम्यान, जरांगे यांच्या याच आंदोलनाची दखल घेत आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने पुण्यातील एका बाप-लेकाने चक्क हुबेहूब मनोज जरांगे यांच्या सारखा दिसणारा मेणाचा पुतळा (Wax Statue) तयार केला आहे. 

पुण्यातील एकविरा कार्ला येथे वॅक्स मूजियममध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा साकारण्यात आलाय. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. ठीकठिकाणी मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले जात आहे. मुंबईकडे निघालेल्या त्यांच्या पायी दिंडीचा लोणावळ्यात चौथा मुक्काम होणार आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी, यासाठी प्रत्येक मराठा होईल तो प्रयत्न करत आहे. अशातच पुण्यातील मावळ तालुक्यातील बाप-लेकाने मनोज जरांगे यांच्या सारखा दिसणारा मेणाचा पुतळा तयार केला आहे. 

पाच फूट सात इंचाचा पुतळा…

कार्ला येथील अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बाप लेकांनी हा मेणाचा पुतळा तयार केला आहे. यासाठी त्यांना तीन महिन्यांचा वेळ लागला. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून, पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे. तर, हुबेहूब जरांगे पाटील साकारण्याचा प्रयत्न म्हाळसकर कुटुंबीयाने केलाय. त्यामुळे, हा पुतळा पाहण्यासाठी अनेक मराठा युवक येथे येऊ लागलेत. तर, जरांगे यांच्या पुतळ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी देखील तरुण गर्दी करतांना पाहायला मिळत आहे. 

मोठ्या मुश्किलीने जरांगेंची परवानगी मिळाली

याबाबत बोलतांना पुतळा तयार करणारे अशोक दसरत म्हाळसकर म्हणाले की,“ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत 57 ते 58 मोर्चा काढण्यात आले. त्यामुळे समाजासाठी आणि मनोज जरांगे यांच्यासाठी काहीतरी करावा अशी आमची इच्छा होती. याबाबत आमच्या कुटुंबीयांची चर्चा सुरू होती. अशात मनोज जरांगे यांचा मेणाचा पुतळा बनवण्याचा आमचा निर्णय झाला. यासाठी आम्ही मनोज जरांगे यांचं मोजमाप घेतलं. मेणाचा पुतळा बनवण्यासाठी मोठ्या मुश्किलीने त्यांची परवानगी मिळाली. असा पुतळा तयार करण्यासाठी सहा महिने ते एक वर्ष लागतो. परंतु रात्र आणि दिवस कष्ट घेत आम्ही तीन महिन्यात हा पुतळा तयार केला. विशेष काही अशा अडचणी आम्हाला आल्या नाही, पण थोडेफार आणखी काम बाकी आहे. उद्यापर्यंत हे काम पूर्ण होईल, असे म्हाळसकर म्हणाले. 

जरांगे करणार पुतळ्याची पाहणी…

तसेच, लोणावळ्यात मुक्काम असल्याने जरांगे पाटील हे वॅक्स मूजियमला भेट देणार असल्याचं लोणावळा सकल मराठा विभाग प्रमुख भाऊ हुलावळे, आणि किरण गायकवाड यांनी सांगितले आहे. मेणाचा तयार करण्यात आलेल्या स्वतःच्या पुतळ्याची जरांगे यांच्याकडून यावेळी पाहणी केली जाणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही?; मनोज जरांगे म्हणाले, ते तर….

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts