Pune news Cognizant walkin drive Viral Video viral video job seekers pune walk in drive amidst unemployment woes

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सध्या सगळ्याच क्षेत्रात बेरोजगारी वाढली आहे. अनेक (job) तरुण नोकरीच्या नव्या नव्या संधी शोधत आहेत. त्यातच सध्या सोशल  मीडियावर पुणयातील एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होताना दिसत आहे.  कॉग्निझंट (Cognizant ) वॉक-इन ड्राइव्हमध्ये एकाच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या इंजिनिअर्सच्या प्रचंड गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सगळे इंजिनिअर तरुणांची नोकरीसाठी असेलली तळमळ या व्हिडीओतून दिसत आहे. 

पुण्यातील हिंजवडीला आयटी हब म्हणून ओळखलं जातं. याच परिसरात पुण्यातील अनेक आयटी कंपन्या आहेत. रोज शेकडो इंजिनियर पुण्यात या आयटी हबमध्ये नोकरीची संधी मिळेल या अपेक्षेने येत असतात. याच हिंडवडी परिसरातील  कॉग्निझंट वॉक-इन ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. या  कॉग्निझंट वॉक-इन ड्राइव्हसाठी शेकडो इंजिनिअर कंपनीच्या बाहेर नोकरीसाठी रांगा लावून उभे होते. या इंजिनिअर्सच्या नोकरीसाठीच्या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत नेमकं काय आहे?

कॉग्निझंट कंपनीच्या बाहेरील हा व्हिडीओ असल्याचं या सोशल मीडियावर पोस्टमध्ये दिसत आहे. साधरण सात दिवसांपूर्वी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात अनेक इंजिनियर आपले रिझ्यूम हाती घेऊन नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. या वॉक-इन ड्राईव्हसाठी साधारण 2900 हून अधिक रिझ्यूम जमा केल्याचं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओवर साधारण तीन हजारहून अनेक कमेंट्स आल्या आहेत. तर सात मिलीयन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

हा व्हिडीओ पाहून भारतातील इंजिनियरची बेरोजगारी लक्षात येत आहे. साधारण एका जागेसाठी किमान तीन हजारहून अधिक अर्ज येत आहे त्यात सगळी ऑनलाईन सोय उपलब्ध असताना वॉक इन इंटरव्हू का घेत आहेत? देशातील इंजिनिअरची नोकरीसाठी अशी परिस्थिती असेल. अशा प्रकरच्या कंपनीत रांगा लागत असतील तर बाकी क्षेत्रातील नोकरीची परिस्थिती कशी असू शकते, याचा अंदाज घेऊ शकतो. शिवाय ही बेरोजगारी ऑनलाईन लक्षात येत नाही वॉक इन इंटरव्हू घेतली तरच लक्षात येते, अशी प्रतिक्रिया इंजिनियरने दिली आहे. 

 


देशात सध्या सगळ्या क्षेत्रत नोकरीसाठी मारामार सुरु आहे. त्यात जेवढ्या आयटी कंपन्या पुण्यात किंवा बाकी शहरात आहेत तेवढेच इंजिनियर बेरोजगार असल्याचं दिसत आहे. बेरोजगारीची आकडेवारी पाहिली तर दोन टक्क्यांनी आकडेवारी घसरली आहे. सध्या सगळ्याच क्षेत्रात नोकरीच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचं दिसत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसधी! संरक्षण मंत्रालयात भरती, लगेच करा अर्ज

 

 

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts