[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) आता शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्येदेखील मतदान केंद्रे (Voting Centres In Co operative Society) सुरू करण्यात येणार आहेत. शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत, त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच त्या सोसायटीच्या बाहेरच्या नागरिकांना देखील त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जावं लागणार आहे.
महाराष्ट्रातील या शहरांमध्ये सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमधे अशी मतदान केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) दिल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील 36 गृहनिर्माण सोसायट्यांमध्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
या आधीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान करता येत होतं. निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर आता मात्र शहरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांमध्येही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदार मतदानासाठी कमी प्रमाणात येतात असं चित्र आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
शहरी मतदारांमधील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी घेतलेल्या या निर्णयाला काही ठिकाणी मतदार आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता आहे. पण निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयाला शहरातील मतदार कशा पद्धतीने साथ देतात हे पाहावं लागेल.
लोकसभा निवडणुका 16 एप्रिलला नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोगाचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे 16 एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे.
निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने 16 एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून धरल्याचं सांगण्यात येतंय. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. त्या माध्यमातून 16 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
[ad_2]