Manoj Jarange Patil rally grand welcome overnight in across pune rally held early morning in pune maratha reservation mumbai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे पुण्यामध्ये अत्यंत दिमाखात स्वागत करण्यात आले. कडाक्याची थंडी असताना सुद्धा त्याची ताम न  बाळगता अवघा मराठा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पुण्यातील रस्त्यांकडे डोळे लावून उभा होता. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पहाटेला झालेली भव्य सभा लोकांमध्ये असलेली मनोज जरांगे पाटील यांची क्रेझ सांगून जात होती. 

मनोज जरांगे पाटील यांनी आज मध्यरात्री दीडच्या सुमारास वडूज येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. भीमा कोरेगाव परिसरामध्ये विजयस्तंभ परिसरात जरांगे पाटलांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा लोक होते. लहानग्यांपासून आबालवृद्धापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हजर होता. 

जरांगे-पाटील यांच्यासह मराठा बांधवांचे मोठ्या उत्साहात स्वागत

तत्पूर्वी, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जरांगे-पाटील यांच्यासह मराठा बांधवांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. पदयात्रेतील सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी-भाकरी अशी भोजनाची व्यवस्था केली. खडकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने साडेतीन हजार चपात्या, पन्नास किलो शेंगदाण्याची चटणी, 50 किलो लसणाची चटणी यांचे वाटप मराठा बांधवांना करण्यात आले.  रांजणगाव गणपती-कारेगाव परिसरातील सर्व गावांत चपाती आणि शेंगदाणा चटणी करण्यात आली होती. सोमवारी दुपारपर्यंत प्रत्येक गावात महिलांमध्ये स्वयंपाकाची लगबग सुरू होती. काही गावांतून लापशी, डाळ-भात सुद्धा विसाव्याच्या ठिकाणी पोहोचविण्यात आली. 

मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी हजारो मराठा स्वयंसेवक मदत करत आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही, याची सुक्ष्म काळजी प्रत्येक स्वयंसेवकाकडून घेतली जात आहे.  आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्याविषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. पुण्यातील पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे. 

आजच्या यात्रेचा मार्ग कसा असणार?

मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा आज सांगवी फाटा येथे दाखल होईल. तेथून  रक्षक चौक,जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे. पुढे चिंचवड स्टेशन- खंडोबा मंदिर, आकुर्डीमार्गे निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्पावरून तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी असतील. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts