Manoj Jarange Patil Maratha rally storm hits Pune stays in Lonavala on 24 jan Understand the Yatra route before getting stuck in traffic

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतन पदयात्रा सुरू केलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आज पुण्यामध्ये पोहोचला आहे. आज पहाटे पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाल्यानंतर पुणे शहरातून त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. 

पुण्यामध्ये जरांगे पाटील यांच्या पद यात्रेचं स्वागत करण्यासाठी हजारोंत्या संख्येनं मराठा समर्थक रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने पुणे पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी येरवडा-खडकी-बोपोडी मार्गे जाण्यासाठी सांगितले आहे. मात्र, विनंती त्यांच्याकडून मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यामध्ये आगमन झाल्यानंतर गर्दी होण्याची शक्यता आहे. 

पदयात्रेचा मार्ग आहे तरी कसा?

पदयात्रेचा मार्ग शहरातून जात असल्याने पुणे,पिंपरी चिंचवड शहरातील मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. खराडी येथून सुरु झालेली पदयात्रा नगर रोडने महालक्ष्मी लॉन्स ते जहाँगिर हॉस्पिटल ते संचेती हॉस्पिटल व तेथून शिवाजीनगर कृषी महाविद्यालय समोरील चाफेकर चौकातून गणेश खिंड रोडने विद्यापीठ चौकात जाईल. 

तेथून औंध मार्ग राजीव गांधी पूलमार्गे पुणे मुंबई महामार्गाने लोणावळा मुक्कामी जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली आहे. नगर रोडवरून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.  पदयात्रा जसजशी पुढे जाईल त्यानुसार वाहतूक बंद करण्यात येणार आहे. 

मुक्कामी पोहोचण्यास सुरुवात होणार 

विमान नगर चौक, रामवाडी चौक, शास्त्रीनगर चौक, गुंजन चौक, तारकेश्वर चौक, पर्णकुटी चौक या भागातील वाहतूक पर्याय मार्गात वळविण्यात आली आहे. कोरेगाव पार्क, आंबेडकर सेतू, मंगलदास चौकात जाणारी वाहतूक गरजेप्रमाणे सर्किट हाऊस चौकाकडे वळवली जाईल. खराडी ते औंध येऊन 22 किलोमीटरचा परिसर आहे. त्यामुळे मुक्कामी पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts