Nashik Anti Terrorist Squad arrest one accused in terror funding case Nashik Maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik ATS :  नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हुजेफ अब्दुल अजीजशेख अस ATS ने अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. कोर्टाने आरोपीला 31  जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. 

नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. आयसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली  हुजेफ अब्दुल अजीजशेख याला अटक करण्यात आली. 
 
आरोपी हा उच्च शिक्षित आणि अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.आता एटीएसने शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये आपली पथकं रवाना केली आहेत. 

आरोपीच्या घर झडतीत एटीएसने 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह हस्तगत केला आहे. संशयित हुजेब शेख सीरिया मधील राबिया उर्फ उम ओसामा या आयसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याची एटीएसची माहिती आहे. 

आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर विशेष न्यायालयाकडून आरोपीला शेखला 31 जानेवारीपर्यंत सुनावली एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ठाणे जिल्ह्यातल्या 41 ठिकाणी एनआयएचे छापे

मागील महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आयसिस या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या आरोपांवरून ठाणे जिल्ह्यासह देशभरात कारवाई केली.  एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. पडघ्यात 31 ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर  14 जणांना ताब्यात घेतले होते. आरोपींकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करण्यात आले आहे. 

ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरीवली शहापूर, मिरा रोड, भिवंडी , कल्याण या ठिकाणी एनआयए आणि एटीएसची पहाटेपासून छापेमारी केली. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts