Manoj Jarange big statement Maratha Reservation Maratha Protest is not stop Protest is postponed marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation Protest Suspended : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि सरकारने काढलेल्या महत्त्वाच्या जीआरनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपलं आंदोलन संपवले असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान, असे असतानाच मनोज जरांगे यांनी एक मोठं वक्तव्य करत पुन्हा सरकारची चिंता वाढवली आहे. मराठा आंदोलन संपवत नसून त्याला स्थगिती देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जरांगेंनी सरकारला ‘खुटी’ मारल्याची चर्चा होत आहे.

रात्री झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर आज सकाळी पहिली प्रतिक्रिया देतांना मनोज जरांगे म्हणाले की,” आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी माझ्या समाजाने खूप संघर्ष केला. आरक्षण मिळत कसं नाही यासाठी शेवटी आम्हाला मुंबईत यावं लागलं. मराठे एवढ्या ताकतीने मुंबईत आले की, या ताकतीमुळेच आज आदेश निघाला आहे. अन्यथा हा आदेश निघाला नसता. मराठे चारही बाजूंनी मुंबईत घुसू लागले आणि सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, आंदोलन संपले नसून, आंदोलन सध्या स्थगित करण्यात येत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts