Corona raises concerns again Death of one patient reported in Maharashtra

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Corona Updates: देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसतेय. शुक्रवारी गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 187 नवे रूग्ण सापडल्याची नोंद आहे. अशात महाराष्ट्रात राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर देशातील कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 5,33,443 झाली आहे. दरम्यान, देशातील एकूण एक्टिव्ह रूग्णांची संख्या आता 1,674 वर आहे. तर गेल्या आठवड्यात ही संख्या 2 हजारांहून अधिक होती.

देशात जानेवारी 2020 नंतर आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकून रूग्णांची संख्या 4,50,24,735 पर्यंत पोहोचली आहे. INSACOG च्या मतानुसार, भारतातील 1,640 प्रकरणं कोरोनाचा सब-व्हेरिएंट JN.1 ची आहेत. आता मध्य प्रदेशात देखील या नव्या व्हेरिएंटचा रूग्ण सापडला आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्णांची संख्या

देशभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ची महाराष्ट्रात 477 प्रकरण आहेत. हा आकडा सर्वाधिक असून त्यापाठोपाठ 249 केसेससह कर्नाटकचा क्रमांक लागतो. यानंतर आंध्र प्रदेश सध्या या प्रकारातील 219 प्रकरणांसह आघाडीवर आहे. केरळमध्ये 156 प्रकरणांची नोंद असून तर गुजरातमध्ये 127 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

इतर राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, गोवा आणि तामिळनाडू यांचाही समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये 96, गोव्यात 90 आणि तामिळनाडूमध्ये 89 रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये 38, तेलंगणात 32, छत्तीसगडमध्ये 25 आणि दिल्लीत 21 गुन्हे दाखल झाले आहेत.

71 देशांमध्ये पसरला JN.1 व्हेरिएंट

JN.1 व्हेरिएंटचे रूग्ण आतापर्यंत 71 देशांमध्ये नोंदवण्यात आलेत. WHO च्या अहवालानुसार, या व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा नवा व्हेरिएंट अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येतंय. अशा परिस्थितीत प्रत्येकाने संसर्ग प्रतिबंधात्मक उपायांबाबत सतत सतर्क राहणं आवश्यक आहे.

Related posts