Republic Day Parade Maharashtra Tableau 2024 Theme Shivrajyabhishek Sohala coronation Shivaji Maharaj

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Republic Day Parade Maharashtra Tableau 2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day Parade) दिल्लीत होणाऱ्या चित्ररथ संचलनात (Tableau Parade) सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथात (Maharashtra Tableau) शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात येणार आहे. “भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान – छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे.सांस्कृतिक मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी कर्तव्यपथावरील संचलनात हा चित्ररथ सामिल करून घेण्याकरता विशेष प्रयत्न केले आहेत.

त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त हौणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सादर केला जाणार आहे.

सन 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली चित्ररथ संचलनात 28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवरती विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. यास अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350 वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवराज्याभिषेकाचा 350 वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून “लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज” या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते. 

शिवाजी महाराजांचे कार्य आजही  सर्वांना प्रेरणादायी आहे. महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. नवी दिल्ली येथे साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग या रथावर दर्शविण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

या चित्ररथाची बांधणी राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात करण्यात येत आहे. शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे.  तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकार चमूच्या  माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अनेकदा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे. यंदाही महाराष्ट्राचा चित्ररथ बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts