Maratha Reservation survey are doing First pass employees Anger Maratha community video viral marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर : राज्य मागासवर्ग आयोगामार्फत (State Backward Classes Commission) होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणासाठी चक्क पहिली पास चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) शहरात तर चक्क शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक यांचीही प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ उडाला आहे. अशाच एका प्रगणक म्हणून नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, काहींना इंग्रजी, मराठी लिहिता, वाचता येत नाही, अशा स्थितीत आम्ही सर्वेक्षणाचे काम कसे पूर्ण करणार, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच, सर्वेक्षणासाठी अहमदनगर महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या अनेक महिलांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यातील बहुतांश महिलांचे शिक्षण जेमतेम चौथी ते नववीपर्यंत असल्याने त्यांना सर्वे करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

सर्वेसाठी पैसे देऊन मुले…

विशेष म्हणजे हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत संपवण्याच्या सूचना आहे. त्यामुळे या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सून, मुलगा व तर काहींनी पैसे देऊन मुले या कामासाठी आणले असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाहीत. 

कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल…

मराठा सर्वेक्षणात सतत प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल एप्लीकेशनमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कामकाज ठप्प पडल्याचे पाहायला मिळाले होते. आता तर चक्क पहिली उत्तीर्ण कर्मचाऱ्याची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केल्याचे समोर आले आहेत. अहमदनगर महानगरपालिकेकडून सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशाच एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. आपलं शिक्षण कमी असल्याने सर्वेक्षणाचे काम करता येत नसल्याची कबुली हा कर्मचारी देत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

असे होणार सर्वेक्षणाचे काम …

  • गाव पातळीवर प्रत्‍यक्ष सर्वेक्षणाच्‍या कामास 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 
  • प्रत्‍येक प्रगणकाकडून 100 कुंटूबाना भेट देवून प्रत्‍येक घराचे सर्वेक्षण करण्‍यात येणार आहे. 
  • सर्वेक्षण झालेल्‍या घरावर मार्कर पेनव्‍दारे चिन्‍हांकन करण्‍यात येणार आहे. 
  • सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत केले जाणार असून, या अंतर्गत प्रत्‍येक कूंटूबास भेट देणार आहे.
  • प्रत्‍येक कुंटूबातील एका सदस्‍यानी घरी थांबून सर्वेक्षण करणारे प्रगणक यांना आपल्‍या कूंटूबाची अचूक माहिती देण्‍याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्‍यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा आजपासून मराठवाड्याचा दौरा; सर्वेक्षणाचा घेणार आढावा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts