नोकरी बदलण्याची इच्छा असलेल्या मुंबईकरांची संख्या पाहून बसेल धक्का! LinkedIn चा खळबजनक अहवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील प्रोफेशनल्‍स सध्या कॉर्परेटमध्ये नोकरकपात आणि आर्थिक अनिश्चितता असताना देखील करिअरच्‍या दिशेने धाडसी पाऊल उचलण्‍यास उत्‍सुक असल्याचं चित्र दिसत आहे. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क असलेल्या ‘लिंक्‍डइन’च्‍या नवीन अहवालामध्ये तरुणांची अस्थिर परिस्थितीमध्येही नोकरीसंदर्भात धोके पत्कारण्याची इच्छा असल्याचं दिसून आलं आहे. ‘लिंक्‍डइन’च्‍या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील 10 पैकी जवळपास 9 (87 टक्‍के) प्रोफेक्‍शनल्‍स 2024 मध्‍ये नवीन रोजगाराचा म्हणजेच जॉब स्वीच करण्याचा विचार करत आहेत. एआयमुळे नोकऱ्यांमधील कौशल्‍य परिवर्तनाला गती मिळत असतानाच लिंक्‍डइनच्या डेटामध्ये, भारतात रोजगारांसाठी आवश्‍यक कौशल्‍यांमध्‍ये मागील 9 वर्षांमध्ये 30% हून अधिक प्रमाणात सकारात्मक बदल झाल्याचं दिसून आलं आहे.

ग्रोथसाठी नोकरी बदलण्याची रिस्क स्वीकारण्याची तयारी

2030 पर्यंत या कौशल्‍यांमध्‍ये जागतिक स्‍तरावर 65 टक्‍क्‍यांनी बदल होण्‍याची अपेक्षा आहे. या परिवर्तनामुळे रोजगार शोधणे आव्‍हानात्‍मक ठरू शकते, असा अंदाज आहे. मात्र मुंबईतील प्रोफेशनल्‍स नोकरी बदलण्यासंदर्भात सकारात्कम आहेत. इतरांपेक्षा वरचढ ठरण्‍याची महत्त्वकांशा असल्याने मुंबईतील 79 % प्रोफेशनल्‍सने नोकरी बदलण्यासंदर्भात आपण विचार करु शकतो असं म्हटलं आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 86 टक्‍के प्रोफेशनल्‍सने लिंक्‍डइनवर अधिक कन्‍टेन्‍ट पोस्‍ट करत वैयक्तिक ब्रॅण्डिंगला प्राधान्‍य देत आहेत. नवीन कौशल्‍ये शिकण्‍यासाठी ऑनलाइन कोर्सेस/लर्निंगवर अधिक वेळ घालवणाऱ्यांची संख्या 90% इतकी आहे. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असलेले लोक एआयचा वापर करण्‍यास देखील उत्‍सुक आहेत. एआय समजून आणि शिकून घेतल्यास अधिक कार्यक्षमपणे व उत्‍पादक पद्धती आत्मसात करुन रोजगार शोधण्यास मदत होईल असं 83% लोकांचं मत आहे. 

लिंक्‍डइनने मुंबईत सर्वाधिक मागणी असलेल्या अव्वल 10 नोकऱ्यांची यादीच तयार केली आहे. या यादीत कोणते जॉब्स आहेत पाहूयात…

1. क्‍लोजिंग मॅनेजर

2. क्‍लायंट अ‍ॅडवायजर

3. सस्‍टेनेबिलिटी मॅनेजर 

4. मेडिकल टेक्निशियन

5. सेल्‍स डेव्‍हलपमेंट रिप्रीझेन्‍टेटिव्‍ह 

6. सोर्सिंग मॅनेजर 

7. रिस्‍क मॅनेजमेंट कन्‍सल्‍टंट 

8. फायनान्शियल प्‍लानिंग अ‍ॅनालिस्‍ट 

9. ग्रोथ मॅनेजर

10. इन्‍व्‍हेस्‍टमेंट बँकर

नव्या लोकांना संधी

या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये भारतातील 95% कंपन्या नव्या लोकांना संधी देण्याचे नियोजन करत आहेत. भविष्यामध्ये एआयच्या माध्यमातून नोकऱ्या मिळवण्यासाठी शर्यत अधिक आव्हानात्मक होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. एआयचं ज्ञान असणाऱ्यांना सर्वच श्रेत्रांमध्ये अधिक प्राधान्य कंपन्यांकडून दिलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts