IDFC FIRST Bank Recruitment Assistant Customer Service Job Mumbai;आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत बंपर भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IDFC FIRST Bank job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबईत तुम्हाला चांगल्या पगाराची संधी मिळणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.  आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजर पदाची भरती केली जाणार आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ब्रांच मॅनेजिंग ऑपरेशनसाठी रिटेल  बॅंकींग व्यवसाय संभाळावा लागणार…

Read More

पत्नीला माहेरी पाठवण्यास पतीचा नकार, चिडलेल्या तिने वाद घातला अन् नको ते होऊन बसले!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. होळीनंतर येणाऱ्या भैयादूजसाठी पत्नीला माहेरी जायचे होते. मात्र पतीने तिला जाण्यापासून अडवले. त्यानंतर या दोघांची इतकी भांडणे झाली की वाद टोकाला गेला. पतीने स्वतःवरच गोळी झाडली आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे तर मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. मात्र, होळीच्याच दिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी माहेरी जात होती. त्यामुळं घरात वाद-विवाद झाले. त्याचवेळी नाराज झालेल्या पतीने अवैध…

Read More

IBM Layoff Jonathan Adashe fired Employee in Meeting;7 मिनिटांची मिटींग आणि कर्मचाऱ्यांची गेली नोकरी, या बड्या कंपनीत हजारो कर्मचाऱ्यांची कपात

( प्रगत भारत । pragatbharat.com) IBM layoff: तुमच्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कामासाठी अनेक मिटींग होत असतील. पण कधी अचानक घेतलेल्या छोट्या मिटींगमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरच घाला घालण्यात आल्याचा प्रसंग घडला तर? हो. काही कर्मचाऱ्यांनी हा अनुभव नुकताच घेतलाय. एखादा बॉम्ब अचानक येऊन पडावा आणि सर्व उद्वस्त व्हावं, याचा प्रत्यय त्यांना आला. जगप्रसिद्ध आयबीएममधून हे वृत्त आलंय. गेल्या दोन वर्षापासून सलग येथून कर्मचारी कपातीचे वृत्त समोर येतंय. पण आता आलेली बातमी नक्कीच धक्कादायक आहे. आयबीएमची मार्केटींग आणि कम्युनिकेशन टीममध्ये नुकतीच कपात करण्यात आली आहे. चीफ कम्युनिकेशन ऑफिसर जोनाथन अडाशेक यांनी कर्मचाऱ्यांची बैठक…

Read More

मुकेश अंबानींचा असाही भाऊ, ज्यानं रिलायन्समध्ये नोकरी करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सोडला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani:  रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आजच्या घडीला त्यांची नेट वर्थ  960474  कोटी इतकी आहे. भारताबरोबरच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांच्या यादीत ही त्यांचे नाव आहे. पण यशस्वी उद्योजक बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. त्यांच्या मार्गातही अनेक अडथळे आले. मात्र, या अडथळ्यांवर मात करत त्यांनी आज रिलायन्स इंडस्ट्रीचे नाव मोठं केलं. 1983000 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या प्रवासात मुकेश अंबानी यांना अनेक सहकाऱ्यांची…

Read More

145 कोटींची नोकरी सोडत उभारली 8300 कोटींची कंपनी, महिलेची प्रेरणादायी कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: मेरिकी बिझनेस वुमन आणि फिनटेक फर्म स्टॅक्स (Stax) ची को फाऊंडर आणि सीईओ सुनीरा मधानीबद्दल जाणून घेऊया.

Read More

Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Nakshatra Parivartan: शनिदेव 7 एप्रिलला शतभिषा नक्षत्र सोडून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गुरुचं वर्चस्व आहे. अशा स्थितीत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे. 

Read More

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! लग्नाला नकार दिल्याने मुलीलाच संपवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Angry Father Killed Daughter: संतापलेल्या अवस्थेत केलेली कृती संकटांना आमंत्रण देते असं म्हटलं जातं. अनेकदा हा रागच अनेक समस्यांच्या मूळाशी असतो. या रागामुळे आपण संकटात सापडू शकतो. संतापलेले असताना घेतलेला एखादा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करु शकतो. अनेकांना क्रोधाच्या परिणामांची कल्पना असते. मात्र त्यांना स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नाही. अशाच 2 हादरवून सोडणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. यापैकी एका घटनेत वडिलांनी मुलीची हत्या केली. तर दुसऱ्या प्रकरणात एका व्यक्तीने संपूर्ण कुटुंबालाच संपवलं. मुलीने नकार दिल्याने हल्ला राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने आपल्याच मुलीची…

Read More

LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाने उमेदवारी जाहीर केलेला भोजपुरी अभिनेता पवन सिंगने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पवन सिंगचं नाव होतं. भाजपाने त्याला पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत.  पवन सिंगने एक्सवर पोस्ट शेअर करत आपण निवडणूक लढू शकत नसल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मी आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास…

Read More

‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर..’; पोलीस स्टेशनमध्येच हवालदाराकडून महिलेबरोबर गैरवर्तवणूक! नोकरी गमावली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Police Constable Misbehave With Muslim Women: वाहनचोरीची तक्रारीसंदर्भात पोलीस स्टेशनला गेलेल्या मुस्लीम महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने चुकीची वागणूक दिल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे. पोलीस स्टेशनमधील मुख्य हवालदारावर महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात नाही. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी या बुरख्यातील तक्रादार महिलेला, ‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर चेहरा दिसत नाहीये,’ असं म्हणाला.  पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई वाहन चोरीला गेल्याने त्यासंदर्भातील तक्रार केल्यानंतर त्यासंदर्भातील तपासाची चौकशी करण्यासाठी ही महिला पोलीस स्टेशनला गेली होती. त्यावेळी तिच्याशी बोलताना पोलीस हवालदाराने एक वाग्रस्त विधान केलं. या प्रकरणाची चांगलीच चर्चा…

Read More

‘जरा लवकर लग्न लावा ना’, भटजीने नकार दिल्यानंतर नवरदेवाने मंडपातच केली धुलाई; FIR दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा टर्निग पॉइंट असतो. याचं कारण यानंतर आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. लग्न लावताना सर्व विधी पार पाडत रितसर पद्धतीने होणं गरजेचं असतं. पण काहींना मात्र लग्नात इतकी घाई असते की कधी एकदा विधी पार पडतात याची वाट पाहत असतात. पण याच हट्टापायी त्यांच्या हातून काहीतरी चुकीचं घडतं. ज्याचा पश्चाताप कदाचित पुढे आयुष्यभर त्यांना करावा लागतो. उत्तर प्रदेशात असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे.  लग्न लावण्यासाठी उशीर होत असल्याने एका नवरदेवाने मंडपातच मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे त्याने…

Read More