गर्लफ्रेण्डने गर्भपातास नकार दिल्याने प्रियकराने एकांतात भेटायला बोलावलं अन् स्क्रूड्रायव्हरने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमधील मयूर विहार परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका 19 वर्षीय गर्भवती तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये तरुणीवर हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा जखमी झालेल्या पीडित गर्भवती तरुणीचा प्रियकर असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणीचा जीव घेण्याच्या उद्देशाने प्रियकराने स्क्रू ड्रायव्हर, ब्लेड आणि दगडांचा वापर करुन हल्ला केला. प्रेयसीने गर्भपात करावा अशी त्याची मागणी होती. मात्र या तरुणीने गर्भपात करण्यास विरोध केल्याने दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. मृत्यूशी देतेय…

Read More