( प्रगत भारत । pragatbharat.com)
India vs England 1st test: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा कर्णाधार रोहित शर्माने मोठा निर्णय घेत मॅचविनर खेळाडूला बाहेर ठेवलं आहे. टॉस झाल्यानंतर रोहित शर्माला प्लेईंग 11 बाबत विचारण्यात आलं तेव्हा रोहितने कुलदीप यादवला बाहेर ठेवलं असल्याचं सांगितलं आहे.
रोहित शर्माला भारी पडणार ‘ही’ चूक?
इंग्लंडविरुद्धच्या या टेस्ट सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस गमावला. यानंतर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. या टेस्ट सामन्यात रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला आणि कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले. हा निर्णय रोहित शर्माला महागात पडण्याची शक्यता आहे. कारण कुलदीप यादव विकेट घेणारा फिरकी गोलंदाज आहे. कुलदीप यादवचा टेस्ट चांगला रेकॉर्ड आहे. कुलदीप यादवने भारताकडून 8 टेस्ट सामन्यात 34 विकेट्स घेतले आहेत.
2017 मध्ये भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर कुलदीप यादव त्याच्या साडेसहा वर्षांच्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी केवळ 8 सामने खेळू शकला आहे. टेस्ट फॉरमॅटमध्ये कुलदीप यादवने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील बहुतांश काळ बेंचवर बसून घालवला आहे. त्याच्या या उत्तम कामगिरीनंतरही कुलदीप यादवला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलंय.
कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अशी आहे इंग्लंडची टीम
जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.