Nagpur Crime News Illegal flavored tobacco traffickers arrested by Saoner police maharashtra crime marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर: राज्यात गुटखा (Gutkha) आणि तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थावर बंदी आहे. मात्र नव-नवी शक्कल लावून  छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक होत असते. आशा छुप्या कारवाईवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवली जाते. अशाच एका छुप्या कारवाईचा सावनेर पोलिसांनी (Crime) भंडाफोड केला आहे. सावनेर पोलीस स्टेशनच्या द्दीतील हेटी ते तेल कामठी रोड दरम्यान एका कंटेनर मध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू (Flavored Tobacco) घेवून जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना (Nagpur News) मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये एकूण 63 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र या कंटेनरच्या चालकाने कंटेनर सोडून पळ ठोकला आहे. 

एकूण 63 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सावनेर पोलिसांनी या कंटेनरचा पाठलाग केला. मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याचा सुगावा लागताच कंटेनरचा चालक हा कंटेनर सोडुन पळुन गेला. त्यानंतर पोलिसांनी कंटेनर क्रमांक आर जे 11 जी सी 5813 ची पाहणी केली असता कंटेनर मध्ये 100 गेरु रंगाचे प्लास्टिक बोऱ्यामध्ये 33 लाख 75 हजार रुपयाच्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याच्या माल आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कंटेनर ज्याची  किंमत 30 लाख रुपये असा एकूण 63 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

फरार कंटेनरच्या चालक- मालकाचा शोध सुरू

या प्रकरणी पोलिसांनी कंटेनरच्या चालक आणि मालकाच्या विरुध्द कलम 328, 188, 272(अ), 273  भा.द.वी. सहकलम 26(1), 26(2), (iv),27(3), (E), 30(2), (A), 3(1), (iii) (अ), 59 अन्न सुरक्षा अधिनियम 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच फरार कंटेनरच्या चालक आणि मालकाचा शोध पोलीस घेत आहे.

ट्रॅव्हल्समधून तंबाखूची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड

नागपूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची नागपुरात तस्करी होते. त्यानंतर नागपुरातून तो माल विदर्भात इतर भागात पाठविण्यात येतो. सोबतच प्रवासी वाहतूक गाडीतून हा माल छुप्या पद्धतीने सर्रास नेला जातो. अशाच एका ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. एका खाजगी ट्रॅव्हल्समधून तंबाखू येणार असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या पथकाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मंगळवार 23 जानेवारीला एमपी 17  पी 1147 ही ट्रॅव्हल्स थांबविण्यात आली.

दरम्यान या ट्रॅव्हल्स मधील प्रवाश्यांची आणि सामानाची झडती घेतली असता, तीन प्रवाशांकडे प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये साडेबारा किलो तंबाखू आणि  साडेतीस किलो पानमसाला आढळला. त्याची किमत 3.62 लाख इतकी होती. पोलिसांनी या प्रकरणी अजयकुमार यादव (29, रिवा, मध्यप्रदेश), पंकज सुनिलदत्त तिवारी (22, मऊगंज, मध्यप्रदेश) आणि  राजेश श्रीराम विश्वकर्मा (45, रिवा, मध्यप्रदेश) या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोबतच ट्रॅव्हल्स देखील जप्त केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts