ai camera smartphones to buy in india for photos and videos samsung google pixel realme iqoo check list inside

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

AI feature Smartphone : सध्या सगळीकडेच AI टूल्स वापरले (Smartphone)  जात आहे. या AI टूल्स सगळी कामं एका झटक्यात करतो, असंही बोललं जातं. मात्र आता हे AI फिचर आपल्या फोनमध्येदेखील मिळणार आहे. फोटो आणि व्हिडिओची आवड असलेल्यांसाठी काही कंपन्यांनी AIकॅमेरे असलेले स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल पण DSLR सारखे महागडे कॅमेरे खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे बजेट नसेल तर तुम्ही चांगल्या दर्जाचा स्मार्टफोन खरेदी करू शकता किंवा AI फिचर कॅमेरा असलेला फोन खरेदी करु शकता. सध्या काही नव्या फोनमध्ये AI फिचर देण्यात येत आहे. कोणते आहेत हे फोन? या फोनमध्ये कोणते फिचर्स मिळणार आहेत? पाहूयात…

Samsung Galaxy S24 Series

नवीन Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus, Samsung Galaxy S24 Ultra शा चा समावेश आहे.  फोनच्या कॅमेऱ्यात AI फीचर्स देण्यात आले आहेत,  यामध्ये तुम्हाला क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 200 एमपी आहे. याशिवाय 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, 10 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स मिळेल. 

google Pixel 8

google Pixel 8 सीरिजमध्ये एआय फिचर देण्यात आलं आहे.   ऑन-डिव्हाइस एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही फोटोंमधील लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू शकाल. म्हणजेच नवीन पिक्सल 8 आणि पिक्सल 8 प्रो फोनचा वापर करून फोटोंमधून ऑब्जेक्ट्स काढून टाकता येतील. याशिवाय या फोनमध्ये अॅडव्हान्स कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत, जे प्रोफेशनल DSLR कॅमेऱ्यांमध्ये आहेत.

3. Realme 11 pro

Realme 11 pro स्मार्टफोनमध्ये तुम्हाला AI कॅमेरा मिळतो. यामध्ये फोटो-व्हिडिओसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 100 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2  मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. 100 मेगापिक्सेलप्रायमरी कॅमेऱ्यात 9 in 1 पिक्सल बाइंडिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यात OIs देखील आहे जे कमी लाईटमध्ये चांगले फोटो काढण्यास मदत करते. 

4. iQOO 12

 iQOO 12 5G मध्ये फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50 एमपी मेन लेन्स, 50 MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 64 एमपी टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. टेलिफोटो लेन्समध्ये तुम्हाला 3 एक्स ऑप्टिकल झूम, 10 एक्स हायब्रिड झूम आणि 100 एक्स डिजिटल झूम मिळते.

इतर महत्वाची बातमी-

Google Pixel 8: आता Smartphone करणार Thermometer चं काम! Google Pixel मध्ये नवे अपडेट्स; शरीराचे तापमान मोजण्यापासून ते सर्कल टू सर्च सारखे भन्नाट फिचर्स!

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts