Supriya Sule NCP Sharad Pawar reaction on Maratha Reservation GR given by CM Eknath Shinde to Manoj Jarange Maharashtra detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती : सरकार हा अध्यादेश लवकरही काढू शकले असेत, पण त्यासाठी जरांगेंना (Manoj Jarange) मुंबईत यावं लागलं. मग या सरकारने अध्यादेश काढला, त्यामुळे हे सरकार किती असंवेदनशील आहे, हे यावरुन स्पष्ट झालं, असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्याचा अध्यादेश सरकारने काढला असून तो मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे यांचे आभार देखील मानले आहेत. 

तसेच धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या देखील आरक्षणाच्या मागण्या आहेत, असं देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं. मुस्लिम धनगर समजाला जे सरकार न्याय देईल, त्यांच्या सोबत आम्ही ताकदीने उभे राहू. त्यांनी नाही दिला तर आम्ही आमचं सरकार आल्यावर न्याय देऊ, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अध्यादेश

मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेला मराठा आंदोलनाचा प्रश्न अखेर राज्य सरकारकडून उत्तरी काढण्यात आला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या, त्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच त्यासंदर्भात अध्यादेश देखील काढण्यात आलाय. पण का केवळ अध्यादेश असून आरक्षण अद्याप मिळालेलं नाही, असा सूर विरोधकांनी लावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय खळबळ माजण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येतेय. 

यंत्रणांचा गैरवापर करुन पक्ष फोडले जातात – सुप्रिया सुळे

बिहारमधील राजकीय घडामोडींना सध्या बराच वेग आलाय. त्यातच आता नितीश कुमार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, यंत्रणांचा गैरवापर करुन पक्ष फोडले जातात. सत्ताधारी दडपशाही करीत असून त्यांच्या विरोधात आम्ही लढत राहू. 

ट्रिपल इंजिन सरकार असंवेदनशील – सुप्रिया सुळे

सध्या राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्याकडे राज्य सरकारचं लक्ष नाही. पाऊस कमी झाला आहे, त्याचं नियोजन सरकारनं करावं. लोक भेटू सांगत आहेत की छावण्या काढा. छावण्या काढण्याची गरज आहे. पण हे ट्रीपल इंजिन सरकार असंवेदनशील असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केलीये. 

ही बातमी वाचा : 

Chhagan Bhujbal : “ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, सगळीकडे एकतर्फी कार्यवाही सुरुय”; छगन भुजबळांची नाराजी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts