Pune Crime news IT engineer woman shot dead in Hinjewadi dead body found in lodge IT Hub In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पिंपरी-चिंचवड, पुणे : आयटी हब हिंजवडीत एका आयटी इंजिनिअर (Pune Crime news) महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडालेली आहे. हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेम संबंधांतून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

दोघे ही लखनऊचे असून आयटी कंपनीत काम करायचे. दोन दिवसांपासून ते लॉजमध्ये राहायला होते, लखनऊवरुन आलेल्या ऋषभ निगम याने महिलेची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर तो मुंबईला पळून गेला. मात्र पळून जाताना तो मुंबई पोलिसांच्या हातून सुटू शकला नाही. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टल सह अटक केली. प्रेम प्रकरणातून हत्या महिलेची झाल्याचे उघड झालं आहे. आता पोलीस या ऋषभ निगम याची चौकशी करतील. त्यानंतर मात्र रात्रीत त्यांच्यात नेमके कशावरून वाद झाले? त्यातून हत्या कशी घडली? बंदूक कुठून आणली? याबाबतचा उलगडा समोर येईल. 

पुण्यातील हिंडवडी परिसरात अनेक मोठ मोठ्या आयटी कंपन्या आहेत. देशातील विविध भागातून अनेक इंजिनिअर तरुण या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी येत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तरुण एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यानंतर काही धूसफूस झाली की टोकाचे निर्णय घेत असतात. आतापर्यंत या परिसरातील इंजिनियर तरुणांच्या संदर्भातील अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. अशा एका प्रेम प्रकरणातून या आयटी इंजिनिअर महिलेची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. 

 

 

हिंजवडीत नक्की चाललंय काय?

काही दिवसांपूर्वी हिंजवडीत पत्नीच्या प्रियकराची माहिती मिळाल्यावर पतीने प्रियकराची चाकुच्या साह्याने वार करत हत्या केल्याचा प्रकार पुण्यातील हिंजवडी येथे उघडकीस आला होता. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.  मृत व्यक्ती बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेत असतांना या प्रकरणाचा उलगडा झाला.पत्नीसोबत किशोरचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला होता. यामुळे त्याने त्याला जीवे मारण्याचा कट रचला. किशोरला दुचाकीवरून सूसगाव येथून वारक गावात मुळशी धरणाच्या बाजूला नेले. या ठिकाणी त्याने लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबला. यावेळी सोबत आणलेल्या चाकूने किशोरच्या मानेवर, चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला होता. यानंतर त्यानंतर किशोरचे हात-पाय बांधून त्याचा मृतदेह मुळशी धरणाच्या पाण्यात फेकून दिला होता.

इतर महत्वाची बातमी-

Pune crime news : दुबईहून सोन्याची तस्करी; पुणे विमानतळावर तब्बल 6 किलोचं सोनं जप्त

Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय? तरुणीला मारहाण केली, कपडे फाडले अन्…; सात जणांवर गुन्हा दाखल

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts