Pune rape news crime news pune actress made serious allegations physically harassed by a man by showing the lure of marriage

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात बलात्काराचं प्रमाण चांगलीच  (Pune Crime News) वाढ झाली आहे. त्यातच आता मराठी आणि हिंदी सिने क्षेत्रामध्ये काम(Pune rape Case) करणाऱ्या एका अभिनेत्रीवर तिच्या प्रियकराने नैसर्गिक आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.  रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. लग्नाला नकार दिल्याने डोक्याला पिस्तूल लावत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधी दरम्यान विमान नगर येथील ‘शुभ गेट वे’ आणि मुळशी येथील ‘रेसिडेन्सी लेक रिसॉर्ट अँड स्पा’ या ठिकाणी घडला. 

या अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार  विराज रविकांत पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री आणि विराज रविकांत पाटील यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकवर झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्रा वाढत गेली. मात्र विराज याचं लग्न झालं होतं तरीही त्याने घटस्फोट घेणार असल्याचे सांगत तिच्याशी ओळख वाढवून प्रेमाचं नाटक केले. त्याने अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यावेळी अभिनेत्रीने लग्नाला नकार दिल्यावर तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले.  नैसर्गिक आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. 

धमक्या देऊन केली मारहाण

हा सगळ्या प्रकार घडल्यानंतर अभिनेत्रीने थेट विजयला टाळण्यास सुरुवात केली. त्यावेळी विजयने अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारले.घरच्यांना का भेटवत नाहीस?’ असे अभिनेत्रीने विचारले असता. तिला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्याच्याकडील पिस्तूल या अभिनेत्रीच्या डोक्यावर ठेवले. ‘मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू जर पोलिसांसोबतकडे गेली , तर तुला दाखवतो मी कोण आहे ते’ असे म्हणत धमकी दिली. 

पुण्यात मुली असुरक्षित?

शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात (Pune Crime News)अडकल्याचं पाहायला मिळालं. त्यात सगळ्याच (Pune rape Case) प्रकारचे गुन्हे आले. मात्र यातही बलात्काराची आकडेवारी पाहिली तर अनेकांच्या भुवया उंचावणार आहे. पुण्यात मागील तीन वर्षात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यंदा 2023 मध्ये तब्बल 394 बलात्काराचे गुन्हे समोर आले आहेत. ही आकडेवारी पाहून पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येतं. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime news : हिंजवडीत आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts