Pune Crime News man beated by koyta in yerwada area pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही आहे.  जुन्या भांडणाचा राग मनात धरून  (Pune Crime News)शिवीगाळ करत दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कोयता डोक्यात मारल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुणे शहरातील येरवडा येथे भारतगनर घडला. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. शहरात भरदिवसा असे प्रकार घडत असल्याने सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

याप्रकरणी राज नारायण सदभैया (वय, 23 रा. भैरवनाथ मंदिर जवळ कतारवाडी, येरवडा, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून यश ओव्हाळ (वय 19 , रा. भारतनगर येरवडा) आणि हितेश सोनवाल (वय 20 आरोग्य भवन जवळ येरवडा, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी राज सदभैया हे त्यांच्या भाऊ शिवाला शोधण्यासाठी मैदानावर गेले होते. त्याच मैदाणावर आरोपी यश आणि हितेश होते.तेथे आरोपी यश आणि हितेश यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यास शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी धारदार शस्त्राने मारहाण केल्याचंदेखील तक्रारीत म्हटलं आहे. 

 

पुण्यात रोज नवे भाई अन् टोळ्या

पुण्यात मागील सहा महिन्यांपासून कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यांचा हा धुमाकूळ कमी करण्याससाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहे. मात्र सध्या बघायला गेलं तर पुण्यात रोज नवी एक टोळी तयार होताना दिसत आहे आणि रोज नवा भाई तयार होताना दिसत आहे. भररस्त्यात मारहाण करणं, गाड्या फोडून दहशत निर्माण करणं, एकमेकांवर क्षृल्लक कारणावरुन हल्ले करणं हे प्रकार सुरुच आहे. भाईगिरीच्या नावाने पुण्यात अनेक परिसरात धुमाकूळ माजवला जात असल्याचं घडत असलेल्या घटनांमधून दिसत आहे. 

विशीतील तरुण गुन्हेगारीत

पुण्यातील गुन्हेगारीतील आरोपींचं वय बघितलं तर विशीतील तरुण आरोपी असल्याचं दिसून येत आहे. कॉलेजमध्ये दादागिरीपासून सुरु झालेली गुन्हेगारी मोठ्या टोळ्यांपर्यंत येऊन पोहचतो. त्यामुळे या तरुणांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांना गुन्हेगारीपासून लांब ठेवणं हे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. 

 

इतर महत्वाची बातमी-

Pune rape Case : पुणे हादरलं! पुण्यात प्रियकराकडून अभिनेत्रीवर रिसॉर्टमध्ये बलात्कार, धमकी देत केली मारहाण,दोघांमघ्ये नेमकं काय घडलं?

Pune Crime news : हिंजवडीत आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts