Manoj Jarange Raigad Visit maratha reservation abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Raigad Visit : मनोज जरांगे आज रायगड दौऱ्यावर, शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार

Manoj Jarange Raigad Tour : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा जिंकल्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासह राज्यभरातील मराठा समाज आनंद साजरा करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मनोज जरांगे रायगडावर (Raigad) जाणार असून, आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरवात होत आहे. याच दौऱ्यात मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. 

याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षाला यश मिळाले असून, मराठा समाजाला अखेर न्याय मिळाला आहे. आपण ही लढाई जवळपास जिंकली आहे. आता जोपर्यंत कायदा होत नाही, तोपर्यंत आपल्याला सजग राहावे लागणार आहे. आपल्या लढ्याला यश मिळाल्याने अगोदर जाहीर केल्यानुसार मी 29 जानेवारीला रायगडावर जाणार आहे. तेथे विजयाचा गुलाल उधळणार आहे.

[ad_2]

Related posts