Newly Married Wife End Life After Husband Death In Gujrat; प्रेमाविवाहानंतर पतीचा मृत्यू, धक्का सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या; दोघांची एकत्रच निघाली अंत्ययात्रा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : प्रेमाच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशीच एक घटना अहमदाबादच्या अमरेली जिल्ह्यात समोर आली आहे. इथे पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे पत्नीने असं काही केलं की सगळ्यांनाच धक्का बसला. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून दोघांनी एकत्र राहण्याची शपथ घेतलेल्या या जोडप्यावर आज एकत्रच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.धवल याने सहा महिन्यांआधी जवळच राहणाऱ्या प्रिन्सीसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांच्या लग्नाला एक वर्षही झालं नाही आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रेमाची सुरुवात होईल एकच वर्ष झालं असताना अशा प्रकारे दोघांचाही मृत्यू होणं, ही एका अतूट प्रेमाची मन सुन्न करणारी कहाणी आहे.

पृथ्वीवर मोठं संकट, फक्त ३० मिनिटांत होणार विनाश? नासाच्या नव्या दाव्याने खळबळ

पतीला आला हृदयविकाराचा झटका…

अमरेली जिल्ह्यामध्ये धवल राठोड (२५)यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कुटुंबियांनी धवलला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. पण तोपर्यंत उशिरा झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तरुण मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. इतकंच नाहीतर धवल यांच्या पत्नीला हा धक्का सहनच झाला नाही. पतीच्या मृत्यूच्या दु:खात पत्नी प्रिन्सी (२२) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबिय धवल यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असतानाच हा प्रकार घडला. प्रिन्सीच्या जाण्याची बातमी मिळताच सगळे हादरले. कुटुंबियांसाठी हा दुसरा मोठा धक्का होता.

शेवटचा प्रवास एकत्र….

सकाळी पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर थोड्या वेळाने पत्नीनेही आत्महत्या केल्यानंतर दोन्ही मृतदेह एकत्रच शविवच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अखेर या दोघांची अंत्ययात्रा एकत्रच निघाली आणि त्यांच्यावर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, धवलच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्या आईने किडनी दान करत त्याला जीवनदान दिलं होतं. त्याचे वडील शेती करतात. तर कुटुंबामध्ये ४ बहिणी आणि धवल हा एकटा भाऊ होता. त्यामुळे धवलच्या अशा जाण्यामुळे आणि नंतर वहिणीच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेची लाट, मोचा चक्रीवादळाचा परिणाम; मुंबईसह ‘या’ शहरांना अलर्ट

[ad_2]

Related posts