pune news mulshi news Dog Attack On Leopard leopard attack in pune district

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक परिसरात सध्या बिबट्यांना वावर वाढत चालला.  आतापर्यंत (Leopard attack) बिबट्याने शिकार करुन (Dog)जनावरं फस्त केल्याचं पाहायला मिळालंय. अनेकांच्या पाळीव कुत्र्यांवरही हल्ला केल्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा समोर आल्या आहेत.  मात्र पिंपरी-चिंचवडच्या मुळशीमधील कासारसाईमध्ये एका घराच्या अंगणात बिबट्या शिरला. यावेळी त्या घराच्या अंगणआत बसलेल्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पळवून लावलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

कासारसाईमधील रहिवासी शांताराम लेणे यां एका घराच्या अंगणातील सीसीटीव्ही व्हिडीओ आहे. यात रात्रीच्या सुमारास बिबटा घरात शिरल्याचं पाहताच कुत्रा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बिबट्या शिकार करण्याच्या हेतुनं त्यांच्या अंगणात आला होता. आपल्यासोबत काय होणार आहे, याची पुसटशीही कल्पना त्या बिबट्याला नसेल. अंगणामध्ये लेणे यांचा पाळीव कुत्रा बसलेला होता.  या कुत्र्याने बिबट्याच्या अंगावर भुंकायला सुरुवात केली. पहिल्यांदा बिबट्या घरात शिरण्याच्या तयारीत होता. मात्र कुत्र्यांने घरात शिरण्यास प्रतिकार केला. त्यानंतर थेट बिबट्यांच्या अंगावर धावून जात कुत्र्यांने कुटुंबियांचा जीव वाचवला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. सध्या लेणे यांच्या पाळीव कुत्र्यांचीदेखील चांगलीच चर्चा होत आहे. 

चाकणमध्येही केला होता बिबट्याने शिरकाव

मागील महिन्यात पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटे बिबट्या आढळला होता. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचं कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं होतं. जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आलं होतं. चाकण एमआयडीसीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्याने या एमआयडीसीची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. याच एमआयडीसीमधील मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत आज बिबट्याने शिरकाव केला होता. यामुळं एमआयडीसीसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती. कंपनी साधारण शंभर एकरमध्ये विस्तारल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर होतं. मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस ही दाखल झाले होते.

नागरिक धास्तावले…

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 

इतप महत्वाची बातमी-

Lonavala News : मेंढपाळाच्या डोळ्यातलं पाणी थांबेना; लोणावळ्यात अन्न विषबाधेमुळे तब्बल 150 शेळ्यांचा मृत्यू, मेंढपाळांवर दु:खाचा डोंगर

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts