pune crime news sexual harassment In pune Young Girl sexually assaulted by two Friend In Manjari area Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात सध्या बलात्काराचं प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यातच एक संतापजनक(Pune Crime News)  घटना समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून 15 वर्षीय मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर दोन तरुणांनी (Pune rape Case) लैंगिक अत्याचार केला आहे. पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे  अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित मुलीचे मित्र होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अनुराग व गणेश यांनी मुलीला फिरायला नेतो असे सांगून फिर्यादी यांच्या सोबत गाडीवर बसून मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेलं. तिथे असलेल्या एकांताचा फायदा घेऊन अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे यांनी मुलीवर आळीपाळीने जबरदस्तीचे शारीरिक संबंध केले  आणि त्यानंतर मुलीला त्या निर्जनस्थळी सोडून निघून गेले.  याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

मित्रानेच केला घात

हा सगळा प्रकार घडल्यानंतर मुलीला अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे या दोघांनी मिळून धमकी दिली. या संदर्भात कोणाला सांगितलं तर मारुन टाकेन म्हणत मुलीला धमकावल्याचंदेखील तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे हे दोघेही या मुलीचे मित्र होते. या दोघांवर विश्वास ठेवून मुलीने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र मित्रांनीच घात केला. त्यामुळे विश्वास नेमका कोणावर ठेवावा,असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यात नेमकं चाललंय काय?

दोन दिवसांपूर्वी मराठी आणि हिंदी सिने क्षेत्रामध्ये काम(Pune rape Case) करणाऱ्या एका अभिनेत्रीवर तिच्या प्रियकराने नैसर्गिक आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला होता.  रिसॉर्टमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला होता. लग्नाला नकार दिल्याने डोक्याला पिस्तूल लावत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होता. 

पुण्यात मुली असुरक्षित?

शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात (Pune Crime News)अडकल्याचं पाहायला मिळालं. त्यात सगळ्याच (Pune rape Case) प्रकारचे गुन्हे आले. मात्र यातही बलात्काराची आकडेवारी पाहिली तर अनेकांच्या भुवया उंचावणार आहे. पुण्यात मागील तीन वर्षात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यंदा 2023 मध्ये तब्बल 394 बलात्काराचे गुन्हे समोर आले आहेत. ही आकडेवारी पाहून पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येतं. 

इतर महत्वाची बातमी-

Dog Attack On Leopard : कुत्रा थेट बिबट्याशी नडला! घराच्या अंगणात शिरलेल्या बिबट्याला पळवून लावलं; व्हिडिओ आला समोर

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts