pune mumbai express highway block 1 February-for itms instalattion know the time and more details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : तुम्ही जर उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरुन प्रवास(mumbai pune express highway) करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करणार असल्याने 1 फेब्रुवारीला हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.  दुपारी 12 ते 2 या वेळेत  बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक बंद राहील, असं  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितलं आहे. 

वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे. पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे पुलावरुन सर्व प्रकारची वाहने जुना मुंबई -पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. तसेच जुना पुणे ते मुंबई मार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळवलं आहे.

यापूर्वीही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेकदा असे ब्लॉक घेण्यात आले आहे. अनेकदा ब्लॉक घेऊन ही कामं करण्यात आली आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येकवेळी दोन तासांचाच ब्लॉक घेण्यात येतो. मात्र काम लवकरात लवकर संपवण्याकडे कल असतो. आतापर्यंत दोन तासांचा ब्लॉक घेऊन साधारण अर्ध्या किंवा एका तासात काम पूर्ण झालं आहे.

काय आहे ITMS सिस्टिम?

आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39 ठिकाणी तब्बल 370 विविध कॅमेरे तैनात असतील. या प्रकल्पासाठी 340 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुणे हादरलं! वाढदिवसाला जाण्याचा बहाणा करत दोन मित्रांकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts