Mumbai Railway Budget 2024 new projects What did the budget get for railway passengers detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : अर्थसंकल्पातून (Budget 2024) महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकेला घसघसशीत निधी आल्याचं चित्र आहे. नवी रेल्वे मार्गिका, दुसरी, तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका यासाठी देखील निधी दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कसारा,कर्जत आणि पुणे या रेल्वेयार्डाचं नुतनीकरण केलं जाईल. सीएसएमटी, एलटीटीच्या विकासाठी देखील निधी दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नेमकं महाराष्ट्राला रेल्वेच्या बजेटमध्ये काय मिळालं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. अर्थमंत्री निर्माला सिमारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात आला. तसेच यावेळी रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला  15 हजार 554 कोटी  रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुंबईकर प्रवाश्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आलीये. या संस्थेमार्फत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेत. यापैकी एमयुटीपी 1 पूर्ण झाला असून  2, 3 आणि 3 ए बाकी आहेत. यामध्ये जितके पैसे रेल्वे देणार आहे, तितकेच पैसे राज्य सरकार देखील देखील एमआरव्हीसीला देणार.

मुंबईकरांसाठी असलेल्या मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या एमयुटीपी प्रकल्पांना किती निधी मिळाला?

एमयूटीपी दोन प्रकल्पला 100 कोटी मिळाले आहेत. यामध्ये जवळपास सर्व प्रकल्प पूर्ण झाले असून काही प्रकल्पांची थोडी कामे बाकी आहेत. तसेच उर्वरित प्रकल्प हे पूर्ण होतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या 5 आणि 6 व्या मार्गिकेसाठी तरतूद करण्यात आलीये. तसेच मुंबई सेंट्रल ते बोरीवली या सहाव्या मार्गिकेसाठी देखील काम सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पांविषयी आणि मिळालेल्या निधींविषयी सविस्तर जाणून घेऊयात

एमयूटीपी 2 प्रकल्पाला 100 कोटी मिळाले

सी एस एम टी ते कुर्ला 5 वी आणि 6 वी मार्गिका
मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका

एमयुटीपी 3 प्रकल्पाला 300 कोटी मिळाले

विरार डहाणू मार्गाचे चौपदरीकरण
पनवेल कर्जत नवीन रेल कॉरिडॉर 
ऐरोली कळवा नवीन उन्नत मार्ग
नवीन लोकल गाड्या (नॉन एसी)
रुलांवरील अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय 

एमयूटीपी 3 ए प्रकल्पाला 388 कोटी मिळाले

गोरेगाव पासून बोरवली पर्यंत हार्बर मार्गाचा विस्तार
बोरवली आणि विरार दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिक
कल्याण आणि बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका 
कल्याण यार्ड रीमॉडलिंग
सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार दरम्यान सीबीटीसी तंत्रज्ञानावर आधारित रेल्वे गाड्यांचे परिचालन 
विविध स्थानकांचे रीडेव्हलपमेंट
मुंबईकर प्रवाशांसाठी नवीन एसी लोकल 

ही बातमी वाचा : 

Railway Budget 2024 : 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद, रेल्वेच्या अंतरिम बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळालं? 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts