jio airfiber launches 3 data booster plans users will get upto 1000gb high speed internet data

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jio AirFibe : जियो गेल्या अनेक (Jio) महिन्यांपासून भारतातील शहरांमध्ये (Jio AirFibe) एअरफायबर नावाची नवीन फायबर सेवा सुरू करत आहे. ही एक वायरलेस इंटरनेट सेवा आहे. ज्या माध्यमातून युजर्सला हाय स्पीड 5 G इंटरनेट सेवा मिळते. जियो एअरफायबर 1 जीबीपीएसपर्यंत फास्ट इंटरनेट स्पीड (Internet speed) देखील देऊ शकते, असा कंपनीने दावा आहे. कंपनीने ही नवीन फायबर सेवा कमर्शियल आणि घरगुती वापरासाठी डिझाइन केली आहे.

जियो  एअरफायबरने लाँच केले तीन प्लॅन

जिओ(Jio) एअरफायबर कनेक्शन सध्या भारतातील 500 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. या वायरलेस ब्रॉडबँड सेवेची व्याप्ती जसजशी वाढत आहे, तसतशी कंपनी यात अनेक नवीन फीचर्सची भर घालत आहे. त्यापैकी एक डेटा बूस्टर प्लॅन आहे, जो युजर्स त्यांचा रोजचा डेटा मर्यादा संपल्यानंतर रिचार्ज करू शकतात. जियोने एअरफायबर सेवेसाठी 3 डेटा बूस्टर प्लॅन लाँच केले आहेत.

जियो एअरफायबरचे तीन डेटा बूस्टर प्लान

-जियो एअरफायबरचा पहिला डेटा बूस्टर प्लॅन 101 रुपयांचा आहे, ज्यामध्ये युजर्संना त्यांच्या बेस प्लॅनच्या त्याच स्पीडवर 100 जीबी अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळतो.
-जियो एअरफायबरचा दुसरा डेटा बूस्टर प्लॅन 251रुपयांचा आहे, ज्यामध्ये युजर्संना त्यांच्या बेस प्लॅनच्या स्पीडवरून 500 जीबी अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळतो.
-जियो एअरफायबरचा तिसरा डेटा बूस्टर प्लॅन 401 रुपयांचा आहे, ज्यामध्ये युजर्संना त्यांच्या बेस प्लॅनच्या त्याच वेगाने 1000 जीबी अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळतो.

-जियो एअर फायबरचे नवीन डेटा बूस्टर प्लॅन माय जिओ अॅप आणि Jio.com उपलब्ध आहेत आणि सर्व एअर फायबर ग्राहक हे प्लॅन वापरू शकतात. एअर फायबरमध्ये युजर्संना एकूण 6 प्लॅनचे ऑप्शन मिळतात. हे प्लान 599 रुपये, 899 रुपये, 1199 रुपये, 1499 रुपये, 2499 रुपये आणि 3999 रुपये आहेत. 

JIO चा 28  दिवसांचा OTT Freee प्रीपेड प्लान

JIO चा रिचार्ज प्लान 398 रुपयांचा आहे. जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्संना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 28 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस तसेच इतर अनेक फायदे मिळतात. जियो च्या या प्लॅनसोबत युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटाही मिळतो. याशिवाय युजर्संना सोनी लिव्ह, झी 5, जिओ सिनेमा प्रीमियम,Lionsgate Play, Discovery Plus सोबत एकूण 12 ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

इतर महत्वाची बातमी-

Nokia Smartphones : Nokia स्मार्टफोन बंद होणार? स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने घेतला मोठा निर्णय

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts