Amit Shah In Nanded City Public Meeting Will Be Held Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amit Shah in Nanded: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने (BJP) देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या 10 व 11 जून रोजी वेगवेगळ्या चार राज्यांमध्ये जाहीर सभा होणार आहेत. तर या चार सभापैकी त्यांची एक सभा नांदेड जिल्ह्यात (Nanded District) होणार आहे. त्यामुळे यासाठी अमित शहा आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यांच्या नांदेड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

नांदेड शहरातील अबचलनगर मैदानावर आज भाजपची जाहीर सभा होणार आहे. तर या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या अनुषंगाने पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर गेल्या आठवड्याभरापासून भाजपकडून या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपचे स्थानिक नेते अक्षरशः सभेच्या ठिकाणी तळ ठोकून आहे. त्यामुळे नांदेडमध्ये होणाऱ्या आजच्या सभेतून अमित शहा यांच्यासह फडणवीस कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

वाहतुकीत बदल करण्यात आला…

अमित शहा यांच्या सभेच्या निमित्ताने शहरातील वाहतुकीत काही बदल देखील करण्यात आले आहेत. नियमित चालणाऱ्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. ही अधिसूचना शनिवार 10 जून 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. ज्यात आसना ते विमानतळ टीपॉईट, शिवमंदीर-राज कार्नर-वर्कशॉप-भाग्यनगर-आनंदनगर-नाईक चौक-अण्णाभाऊ साठे चौक-यात्री निवास-चिखलवाडी कॉर्नर-गुरुद्वारा गेट नंबर 1 कडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. नाईक चौक-महाराणा प्रताप चौक ते बाफना टीपॉइटकडे  येणारा-जाणारा रस्ता हा वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. देगलूरनाका-बाफना टी पॉइट ते हिंगोली गेटकडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. जुना मोंढा ते कविता रेस्टॉरेन्टकडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे. 

वेगवेगळ्या चार राज्यांमध्ये जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात असलेल्या भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 10 व 11 जून रोजी वेगवेगळ्या चार राज्यांमध्ये जाहीर सभा होत आहे. ज्यात शाह शनिवारी गुजरातमधील पाटण आणि महाराष्ट्रातील नांदेडमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. रविवारी आंध्र प्रदेशला रवाना होण्यापूर्वी ते तामिळनाडूतील वेल्लोर येथेही एका सभेला संबोधित करणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded News: अमित शाह उद्या नांदेडमध्ये, वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल

[ad_2]

Related posts