IND vs ENG 2nd Test: India’s challenge of 389 runs against England Cricket news Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs ENG 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) मालिकेतील दुसऱ्या सामना विशाखापट्टनमच्या रेड्डी स्टेडियमवर सुरु आहे. दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारताने इंग्लंडसमोर 389 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून शुभमन गिलने (Shubhman Gill) शतकी खेळी करत कसोटीत भक्कम आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडियाने मजबूत आघाडी घेतली. दरम्यान इंग्लंडचा दुसरा डाव सुरु झाला असून तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 67 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी आता 332 धावांची गरज आहे. भारताकडून शुभमन गिलने 147 चेंडूमध्ये 107, अक्षर पटेल 84 चेंडूमध्ये 45 तर रवीचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यरने प्रत्येकी 29 धावांचे योगदान दिले. 

पहिल्या डावात भारताने यशस्वी जैस्वालच्या द्वशतकी खेळीच्या जोरावर 396 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात 253 धावा केल्या. बुमराहने 6 विकेट्स घेत संपूर्ण संघच गारद केला. त्याच्याशिवाय कुलदीप यादवनेही 3 विकेट्स पटकावल्या. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरण्यापूर्वी भारताकडे 143 धावांची आघाडी होती. त्यानंतर शुभमन गिलच्या शतकी खेळीमुळे ही आघाडी अतिशय मजबूत झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडला 389 धावा कराव्या लागणार आहेत.

इंग्लंडकडून पहिल्या डावात Zak Crawley ने 79 धावांची खेळी केली. तर बेन स्टोक्सनेही 45 धावांचे योगदान दिले. मात्र, झॅक शिवाय इतर कोणत्याही खेळाडूला मोठी कामगिरी करता आली नाही. स्टोक्सशिवाय जॉनी बेयरस्टोने 25 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून रेहान अहमद, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स पटकावल्या. दरम्यान चौथ्या डावात फलंदाजी करणे अतिशय कठीण असते. पहिल्या डावात फ्लॉप ठरलेल्या इंग्लंडच्या संघाला दुसऱ्या डावात विजयासाठी 389 धावा करता येतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. 
 

पहिल्या डावात यशस्वी जैस्वालची फटकेबाजी 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने तंबूत परतत राहिले. पण यशस्वी जैस्वाल एका बाजूने डाव सांभाळला. भारतीय संघाला पहिला धक्का 40 धावांवर बसला. कर्णधार रोहित शर्मा 14 धावा करून बाहेर पडला. यानंतर शुबमन गिल 34 धावा करून जेम्स अँडरसनचा बळी ठरला. तर श्रेयस अय्यरने 27 धावा केल्या. श्रेयस अय्यरला टॉम हार्टलेने बाद केले. रजत पाटीदार 32 धावा करून रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.


इतर महत्वाच्या बातम्या 

Shubman Gill : चाचपडणारा गिल अखेर ‘यशस्वी’ मार्गावर; शुभमनच्या झुंजार शतकाने टीम इंडिया भक्कम स्थितीत!

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts