Pune maharashtra marathi News Police sub inspector suspended in Pune University lalit kendra case, 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्राच्या (Lalit Kala Kendra) आवारात तोडफोड प्रकरणी आता नवीन माहिती समोर येतेय. या घटनेवेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांकडूनच हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर (Sachin Gadekar) यांना निलंबित करण्यात आले आहे, याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी निलंबनाचे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे, दरम्यान गाडेकर यांच्याकडून घटनेची योग्य दखल न घेतल्याने ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याच प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. 

 

गाडेकर यांना बळीचा बकरा बनवला जातोय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी संध्याकाळी पाच वाजता तोडफोड करण्यात आली. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल निलंबन करण्यात आलं. मात्र या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याच प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. कारण ललित कला केंद्राच्या कार्यालयाला शनिवार सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. अनेक पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी ललित कला केंद्राच्या भोवती तैनात होते. 

 

पोलीसांनी जाणीवपूर्वक ही तोडफोड होऊ दिली का?

एबीपी माझाने देखील शनिवारी दुपारी एक वाजता याविषयीची बातमी दाखवली होती. मात्र संध्याकाळी पाच वाजता हा बंदोबस्त अचानक बाजूला करण्यात आला. ज्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना तोडफोड करण्यासाठी रान मोकळ झालं. त्यानंतर पोलीसांनी जाणीवपूर्वक ही तोडफोड होऊ दिली का? हा प्रश्न विद्यापीठाच्या आवारात विचारला जातोय. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच निलंबन करण्यात आलंय.  मात्र विद्यापीठात बंदोबस्तासाठी पन्नासहून अधिक पोलीस तैनात असताना तोडफोड झालीच कशी? अचानक पोलीस कॉन्स्टेबलना बाजूला होण्याच्या सुचना कोणी दिल्या? या घटनेच खापर एकट्या पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांच्यावर का फोडल जातय? या प्रश्नांची उत्तरं पुणे पोलिसांकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

 

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न 

ज्यावेळी ललित कला केंद्राच्या आवारात ही घटना घडली, त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक गाडेकर यांच्यासह अनेक पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते, मात्र इतका बंदोबस्त असतानाही ही घटना घडलीच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तोडफोड झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिस उपनिरीक्षक गाडेकर यांनी घटनेची योग्य दखल घेतली नाही, तसेच नियंत्रण कक्षाला तातडीने माहिती दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी उपनिरीक्षक गाडेकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

 

नेमकं काय घडलं?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून 2 फेब्रुवारीला रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला.  यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली.  या नाटकांत राम आणि सीता यांच्यासंदर्भात काही आक्षेपार्ह दृष्य दाखवण्यात आली होती. 

 

सहा जणांना अटक 

या प्रकरणी ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना नाटकाबाबत अटक करण्यात आली आहे. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्रने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला आणि नाटक बंद पाडण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाटकाशी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाटकाचे दिग्दर्शक,  काम करणारे कलावंत यांच्यासह ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांना अटक करण्यात आली

 

 

 

हेही वाचा>>>

Pune News : पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा; ललित कला केंद्राच्या प्रमुखासह सहा जणांना अटक, कुलगुरुंची भूमिका काय?

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts