Pune University : ललित कला केंद्राची पोलिसांनी जाणीवपूर्वक तोडफोड करु दिली का? सवाल उपस्थित

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून काल संध्याकाळी पाच वाजता तोडफोड करण्यात आली. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आलंय. &nbsp;मात्र या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणण आहे. &nbsp;कारण ललित कला केंद्राच्या कार्यालयाला काल सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त होता. अनेक पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी ललित कला केंद्राभोवती तैनात होते. &nbsp;एबीपी माझानेही शनिवारी दुपारी एक वाजता याविषयीची बातमी दाखवली होती. मात्र संध्याकाळी पाच वाजता हा बंदोबस्त अचानक बाजूला करण्यात आला… ज्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना तोडफोड करण्यासाठी रान मोकळ झालं. त्यानंतर पोलीसांनी जाणीवपूर्वक ही तोडफोड होऊ दिली का हा प्रश्न विद्यापीठाच्या आवारात विचारला जातोय.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts