baramati crime story husband murdered wife in a lodge room and he disappeared police enquiry started

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime : बारामती (Baramati) शहरातील गंगासागर लॉजवर रविवारी (4 फेब्रुवारी) संध्याकाळी एक खळबळजनक घटना घडली, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. रेखा विनोद भोसले असं या महिलेचं नाव आहे. विनोद भोसले याने पत्नीला लॉज रुमवर नेलं आणि तिची हत्या करुन तो पसार झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे.

लॉजवरून जाताना पती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

आरोपी पती लॉजवरून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पतीनेच हा खून केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात मयत महिलेचे वडील महादेव सोनवणे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावरून बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या बारामती शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

लॉजवर रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

पोलिसांना प्रकरणाची माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पतीने धारदार शस्त्राने पत्नीचा खून केला होता. या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अवस्थेत लॉज रुमवर आढळला. यानंतर आता आरोपी पतीचा शोध घेतला जात आहे.

आठवडाभरापूर्वी मध्य प्रदेशातही घडला असाच प्रकार

मध्य प्रदेशमधील डिंडोरी जिल्ह्यातील हत्याकांडाची थरकाप उडवणारी घडणारी घटना समोर आली होती. नवऱ्याने  SDM पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी रक्ताने माखलेले कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतले. 24 तासानंतरही या हत्याकांडात धक्कादायक खुलासा समोर आला. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात देखील घेतलं. 

डिंडोरी जिल्हातील शहपुरा येथे एसडीएम निशा नापित यांचा रविवारी (28 जानेवारी) मृत्यू झाला होता. 24 तासानंतर पोस्टमार्ममध्ये धक्कादायक खुलासा झाला. निशा हिचा खून झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आले आहे. निशा हिला तिचा पती मनिष शर्मा याने संपवलं होतं. डीआयजी मुकेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार निशाला गळा दाबून संपवलं.

पुरावा मिटवण्यासाठी लढवली शक्कल

डीआयजी मुकेश श्रीवास्तव यांनी एसडीएम हत्याकांडाबद्दल सांगितलं की, पुरावे लपवण्यासाठी मनिष शर्मा याने कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवून सुकवले होते. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि अन्य पुरावाच्या आधारावर मनिष शर्मा याला अटक केली आहे. त्याच्यावर भादवि कलम  02,304 बी आणि 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा:

Maharashtra : शासकीय कंत्राटदारांना राजकीय गुंडापासून संरक्षण द्या, कायद्यासाठी कर्मचारी आक्रमक; फेब्रुवारीअखेरपर्यंत कायदा न केल्यास विकासकामं बंद करण्याचा इशारा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts