All party obc leaders should focus on saving reservation says chhagan bhujbal | सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यावर फोकस करावं



( प्रगत भारत । pragatbharat.com)

आम्ही ज्या रॅली घेतो त्यात सर्व पक्षांचे आमदार असतात. सर्व पक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येतायेत. अशा वेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तर इतर सर्व मंडळी काय करणार? मतप्रवाह वेगवेगळे वाहतील. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर लक्ष द्यायला हवं, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी नेत्यांची कशासाठी बैठक वगैरे होती मला माहित नव्हतं. त्यांनी पक्ष काढायचा वगैरे निर्णय घेतलाय. माझी भूमीका ही आहे की, ओबीसी आरक्षण कसं वाचवायचं यावर फोकस आहे. कोर्टाची लढाई सुरु आहे, यावर फोकस करणं आवश्यक आहे.

सर्व पक्षीय नेत्यांचे ओबीसी आरक्षण वाचवण्यावर लक्ष असायला हवं  

आम्ही ज्या रॅली घेतो त्यात सर्व पक्षांचे आमदार असतात. सर्व पक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येतायेत. अशा वेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तर इतर सर्व मंडळी काय करणार? मतप्रवाह वेगवेगळे वाहतील.  ओबीसी एकत्रित येतायेत त्यात खंड पडेल का? यावर विचार करायला हवा.  माझं स्पष्ट मत आहे की, सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर फोकस असायला हवा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

भुजबळांचा मनोज जरांगेंवर पलटवार

भुजबळ सरपंच होणार नाहीत, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. यावर छगन भुजबळांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. जरांगेंना सांगा तुम्ही आधी ग्रामपंचायतीला निवडून या, तुम्ही आमच्या धनगर, नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करत आहात. ते आधी थांबवा, असा छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.  


हेही वाचा


Related posts