[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : संसदेचं विशेष अधिवेशन (Parliament Special Session) 18 सप्टेंबरपासून सुरू होतंय. 19 तारखेला हे अधिवेशन नव्या इमारतीत शिफ्ट होणार आहे. मात्र त्याआधी, म्हणजे 17 सप्टेंबर रोजी नव्या संसद इमारतीवर तिरंगा फडकवण्याचा सोहळा पार पडणार आहे. याच दिवशी या नव्या इमारतीत विश्वकर्मा पूजा देखील आहे. योगायोग म्हणजे 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतला सोहळा गाजणार हे नक्की..
संसद भवनातील सूत्रांनी एबीपी न्यूजला ही महिती दिली आहे. केंद्रीय लोक निर्माण विभागाने नवी इमारत बांधली आहे. नव्या संसदेत तीन प्रवेशद्वार आहेत . या तीन प्रवेशद्वारापैकी एक मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या गजद्वारासमोर ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. उद्घाटानंतर पार पडणारा हा पहिलाच सोहळा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 22 सप्टेंबरला विशेष अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीत सुरू होणार आहे. नव्या संसदेत उद्घाटनानंतर होणारा हा पहिला कार्यक्रम आहे. नव्या संसदेचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.
नव्या संसदेत उद्घाटनानंतर होणारा पहिला कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईत नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन भाजपने सुरु केले आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप सक्रिय होणार आहे. मुंबईत जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी 15 दिवस कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रक्तदान शिबीर, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, स्वच्छता मोहीमांचा धडाका असणार आहे. तसेच खासदारांपासून आमदार, नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्षांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमात सामील करून घेण्याचे आदेश आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत कार्यक्रम सुरु राहणार आहे.
हे ही वाचा :
संसद कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश तयार, विशेष अधिवेशनात संसद अधिकारी आणि कर्मचारी दिसणार नव्या ड्रेस कोडमध्ये
[ad_2]