Ashadhi Wari 2023 Pune Police Bans Drone Photography During Palkhi Ceremony

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीसाठी वारकरी सज्ज झाले आहेत. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे तर उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. लाखो वारकरी या सोहळ्यासाठी उत्सुक आहेत. वारी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्य़ात अनेक हौशी फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करतात. मात्र यावर्षी ड्रोन कॅमेऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी हा आदेश दिला आहे. 

पालखी सोहळ्याची सुरक्षा आणि पावित्र्य जपण्याच्या प्रयत्नात पुणे शहर पोलिसांनी फोटोग्राफीसाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर  पुणे शहर परिसरात सक्त मनाई करण्यात आली. भाविक आणि प्रेक्षकांना योग्य परवानगी घेऊनच मिरवणुकीचे एरियल शॉट्स घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी 12 जून ते 15 जून या कालावधीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू येथून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून आगमन होताना होणार आहे. पालखी सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातून आणि बाहेरून मोठ्या संख्येने लोक येतात. पालखी सोहळ्याचं फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सार्वजनिक सुरक्षिततेसाठी संभाव्य धोके निर्माण करतो. पुणे पोलिसांनी पालखी सोहळ्यादरम्यान ड्रोन चालवण्यापूर्वी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही अनधिकृत ड्रोन फोटोग्राफीवर कठोर कारवाई केली जाईल, असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 

वारी पूर्वी पोलीस सज्ज! 

12 जून रोजी शहरात येणार्‍या पालखी मिरवणुकीसाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. हडपसर आणि वानवडी पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या युनिट 5 ला दरोडेखोरांच्या टोळीची माहिती मिळाली. गर्दीचा फायदा घेत वारी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना लुटण्याचा कट रचत होते. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत रविदर्शन चौकाजवळील राज्य परिवहन बसस्थानकावर थांबलेल्या दोन संशयितांची तपासणी केली. संशयित श्रीकांत राजू जाधव (वय 21, रा. मुंढवा) आणि दिलीप बलभीम गायकवाड (वय 33, रा. मुंढवा) या दोघांनी एकूण एक लाख 10 हजार रुपये किमतीचे सात चोरीचे मोबाईल पोलिसांना दिले. 

उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान

आषाढी वारीसाठीवारकरी सज्ज झाले आहेत. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे तर उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.  त्यानंतर तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होणार आहे तर उद्या ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आकुर्डीत असणार आहे. 

[ad_2]

Related posts