daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 8 February 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 8 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी इतरांच्या कामात अनावश्यक ढवळाढवळ केल्याने तुमची बदनामी होऊ शकते. विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आजचा दिवस शुभ आहे. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक लाभ आणि योजना पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. खर्च वाढल्याने आर्थिक संकटही निर्माण होऊ शकते.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्याने विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागेल.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. कुटुंबासोबत खरेदीला गेल्याने खर्च वाडू शकतो.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना अचानक येणाऱ्या खर्चाच्या बोजला सामोरे जावं लागेल. नोकरदार लोक आपली कामे पूर्ण करण्यासाठी शक्य ती मेहनत करतील. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी अविवाहित लोकांसाठी चांगले स्थळ येऊ शकते. जोडीदारासोबत एखाद्या विषयावर वाद होऊ शकतो.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकेल.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारची समस्या नसतानाही मन अस्वस्थ राहील. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी एखादे महत्त्वाचे कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. मित्रासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखाल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts