asus chromebook cm14 laptop under 30000 available in amazon sale check features an more specifications marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asus Chromebook Laptop : जेव्हा जेव्हा आपण लॅपटॉप (Laptop) विकत घेण्याचा विचार करतो तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाला कमी कमी किंमतीत आणि जास्तीत जास्त चांगली वैशिष्ट्य असणारा लॅपटॉप हवा असतो. तसेच, त्या लॅपटॉपची बॅटरी देखील टिकाऊ आणि जास्त वेळ चालणारी असावी अशी आपली इच्छा असते. अशातच, जर तुम्हालाही नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल आणि तुमचं बजेट 30 हजारांपर्यंत असेल तर या ठिकाणी Asus ने तुमच्यासाठी Asus Chromebook CM14 हा लॅपटॉप लाँच केला आहे.

स्लीक डिझाईन, 180 डिग्री फ्लॅट बिजागर, 14 इंच डिस्प्ले आणि वाय-फाय 6 सारख्या वैशिष्ट्यांसह लॉन्च केलेल्या या Asus लॅपटॉपची बॅटरी लाईफ खूपच आश्चर्यकारक आहे. या लॅपटॉपमध्ये आणखी कोणकोणते खास फिचर्स उपलब्ध आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  

Asus Chromebook CM14 ची भारतात किंमत किती?

Asus कंपनीचा हा लेटेस्ट लॅपटॉप Gravity Grey कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तुम्ही हा लॅपटॉप Chromebook ई-कॉमर्स साईट Amazon वरून फक्त 26,990 रुपयांना खरेदी करू शकता.

Asus Chromebook CM14 स्पेसिफिकेशन 

18.3 मिमीच्या जाड आणि आकर्षक डिझाईन केलेल्या या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा एलईडी बॅकलिट अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे जो फुल-एचडी प्लस रिझोल्यूशन (1,920 x 1,080 पिक्सेल) ऑफर करतो. या लॅपटॉपमध्ये 250 nits पीक ब्राईटनेस सपोर्ट आहे आणि या डिव्हाईसमध्ये Chrome OS ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे.

वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या डिव्हाईसमध्ये MediaTek Kompanio 520 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी ARM Mali G52 MC2 GPU आहे. प्रोसेसरची कमाल कार्यक्षमता 2.0 GHz पर्यंत आहे.

रॅम आणि स्टोरेज 

रॅम आणि स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, या Chromebook मध्ये तुम्हाला 8 GB LPDDR4X रॅम आणि 128 GB eMMC 5.1 स्टोरेज मिळते. ऑडिओसाठी कंपनीने या लॅपटॉपमध्ये इन-बिल्ट स्पीकर दिले आहेत, जर तुम्हाला हेडफोन लावून म्युझिक ऐकायचे असेल तर यासाठी जॅकही देण्यात आला आहे.

लॅपटॉपची बॅटरी कशी आहे? 

Asus च्या बॅटरी लाईफबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने असा दावा केला आहे की, हा लॅपटॉप एकदा तुम्ही पूर्णपणे चार्ज केल्यानंतर साधारण 15 तास टिकतो. कनेक्टिव्हिटीसाठी, या डिव्हाईसमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.3, वाय-फाय 6, एक यूएसबी 3.2 जनरेशन 1 टाईप-ए पोर्ट, दोन यूएसबी 3.2 जनरेशन 1 टाईप-सी पोर्ट आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Technology : मायक्रोसॉफ्ट तब्बल 20 लाख भारतीयांना देणार AI ट्रेनिंग; सीईओ सत्या नडेला यांची मोठी घोषणा

अधिक पाहा..

Related posts