Pune crime news Pune police pune criminal parade in police commissioner office maharashtra CP amitesh kumar DCP amol zende

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी आयुक्त पदाचा कार्यभार (Pune Crime news)  स्वीकारताच शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्तालयात गेल्या 2 दिवसांपासून शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्यांतील सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. मात्र तरी सुद्धा या “भाई लोकांची” बगल बच्चे आपला भाई किती मोठा आणि थोर आहे हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर रिल्स अपलोड करत आहेत. आता तुम्ही सुद्धा जर गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे काही व्हिडिओ टाकत असाल हे रिल्स तुम्हाला पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवू शकतात. 

पुणे पोलिसांनी 2 दिवसात तब्बल 500 गुन्हेगारांना बोलवून  तंबी दिली. सोशल मीडियावर मात्र काहीजण बॉस, भाईंचे व्हिडीओ अपलोड करताना दिसत आहेत. त्यांच्या याच व्हिडीओवर आता पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यात हातात कोयते दिसले तर क़डक कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

मंत्र्यांच्या भेटीगाठी अन् आयुक्तालयात चिडीचूप उभे

पुण्यातील कुख्यात गुंडाकडून मंत्रालयात रिल्स काढून स्टंटबाजी करण्याचा प्रकार समोर आला. मुख्यमंत्री यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला गेलेल्या एका गुंडाचा फोटो तसचं आसिफ दाढी याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतलेली भेट असे अनेक प्रकार पाहायला मिळाले.‌ अशा परिस्थितीत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या 50  टोळ्यांतील सुमारे  सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले.

कोणताही गुन्हा करायचा नाही. गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल, असा इशारा गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिले. मात्र तरी सुद्धा काही जणं अजूनही याची गंभीर दखल घेत नसल्याचं दिसून आलं.

आमचं कोणतंही सोशल मीडिया  अकाऊंट नाही; कुख्यात गुंडांची कबुली

कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या संदर्भात एक व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी या अकाउंटवर कारवाई करत ते अकाउंट सस्पेंड केलं. असे अनेक कुख्यात गुंडांचे अकाउंट सोशल मीडियावर आढळून आले आहेत मात्र दुसऱ्या बाजूला पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांनी पोलिसांना स्वतः जबाब देत आम्ही स्वतः कुठले ही व्हिडीओ टाकत नाहीत असल्याची कबुली दिली. आमचे वयक्तिक कुठले ही अकाउंट सोशल मीडियावर नाही, असा जबाब या गुंडांनी पोलिसांना दिला आहे. 

तरुणांवर कठोर कारवाई होणार

पुण्यातील नामचीन गुंडांचे बहुधा त्यांच्या चिल्ल्या पिल्ल्या लोकांनी त्यांच्या भाईंच्या नावाने अनेक अकाउंट बनवले आहेत आणि याच अकाउंटवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्या ही गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत असल्याच्या पोस्ट किंवा व्हिडीओ दिसले तर ते अकाउंट तर सस्पेंड होईलच पण ते चालवणारे तरुणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

सोशल मीडियाचा एक व्हिडीओ जेलही हवा दाखवणार

21 व्यां दशकात सोशल मीडियाचा वापर अनेक चांगल्या गोष्टींसाठी केला जातो मात्र ही मिसरूड न फुटलेली आणि स्वताला डॉन समजणारी टोळी या सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात एक वेगळं चित्र निर्माण करताना पाहायला मिळत आहे. पण आता पोरांनो तुम्ही जर हातात बंदूक, कोयता घेऊन व्हिडीओ जर सोशल मीडियावर टाकला तर तुम्हाला तुमचा पुढचा मुक्काम जेलमध्येच असेल. 

इतर महत्वाची बातमी-

Pune News : श्रीराम-सीतेसंदर्भात आक्षेपार्ह स्टेटस; पिंपरी चिंचवडमध्ये एकावर गुन्हा दाखल, स्टेटसमध्ये नेमकं काय लिहिलंय ?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts