There will be transit of 4 planets in February people of this zodiac be careful

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Grah Gochar of February Month: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्याला ग्रहांचं गोचर होतं. फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. या महिन्यात चार ग्रह बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य आपल्या राशी बदलणार आहेत. बुध 1 फेब्रुवारीला मकर राशीत, मंगळ 5 फेब्रुवारीला मकर राशीत आणि 12 फेब्रुवारीला शुक्र राशीत प्रवेश करणार आहे. 

मंगळ, बुध आणि शुक्र एकत्र मकर राशीत त्रिग्रही योग तयार करणार आहे. अशा परिस्थितीतही काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. या महिन्यातच शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. तर 13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. एकाच राशीत शनी आणि सूर्याची उपस्थिती काही राशींसाठी त्रासदायक ठरू शकते. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे. 

मिथुन रास 

मिथुन राशीच्या लोकांसाठी, बुध ग्रह आठव्या भावात स्थित आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ग्रह गोचरमुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लोकांचे कुटुंबातील सदस्यांशी मतभेद असू शकतात. तुम्हाला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. खर्चात वाढ होईल.

धनु रास 

धनु राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना चढ-उतारांचा असू शकतो. कामाशी संबंधित काही योजना बनवल्या असतील तर त्या पूर्ण करण्यात अडथळे येऊ शकतात. तुम्हाला बरेच पैसे खर्च करावे लागणार आहेत. कोणत्याही शुभ कार्यासाठी थांबा, वेळ अनुकूल नाही. काही मुद्द्यावरून कुटुंबात मतभेद होऊ शकतात.

मीन रास 

मीन राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. कुटुंबात कलह वाढण्याची शक्यता आहे. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. 

कुंभ रास 

कुंभ राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या संक्रमणामुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शनी कुंभ राशीत अस्त आणि सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. वडिलांकडून फारसे सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडे निराश होऊ शकता. कामाच्या ठिकाणीही थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts