Kenya record in t20, ही कसली आंतरराष्ट्रीय मॅच; फक्त ३ ओव्हरमध्ये संपली, स्कोअरबोर्ड पाहाच! – kenya beat cameroon in 20 balls 4th largest margin of victory by balls remaining in t20 international( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: एखादी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच फक्त २० चेंडूंची झाली असे कोणी सांगितले तर तुम्ही त्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. हस्यास्पद वाटणारी ही घटना दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टी-२० मध्ये फक्त चौथ्यांदा असे झाले आहे की मॅच १०० चेंडू राखून जिंकली.

केनिया आणि कॅमरून यांच्यात Willowmoore Park, Benoni येथे टी-२० मॅच झाली. या सामन्यात केनियाने कॅमरूनचा ९ विकेटनी पराभव केला. कॅमरूनने प्रथम फलंदाजी करताना १४.२ षटकात सर्वबाद ४८ धावा केल्या. केनियाकडून यश तालतीने ८ धावात ३, शेम नोचेने १० धावात ३ विकेट घेतल्या. लुकासने २ तर गेरार्डने १ विकेट घेतली.

वाचा- भारताची रंगीत तालीम आजपासून; वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये, टीम इंडियाची तयारी घरातून

विजयासाठी ४९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या केनिया संघाने ३.२ षटकात १ बाद ५० धावा केल्या. रुशब पटेलने १४ धावा तर सुखदीप सिंहने १० चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. नेहेमिआहने नाबाद ७ धावा केल्या. केनियाने ही लढत फक्त ३.२ षटकात जिंकली.

वाचा- IND vs AUS T20I-भारताला मिळाला नवा गोलंदाज, आता ऑस्ट्रेलियाची काही खैर नाही


वाचा- सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमधील मोठा विक्रम धोक्यात; ऑस्ट्रेलियात हा दिग्गज खेळाडू मोडणार रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ही चौथी वेळ आहे की जेव्हा एखाद्या संघाने १०० पेक्षा अधिक चेंडू राखून विजय मिळवला असेल. सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवण्याच्या बाबत केनिया चौथ्या स्थानावर आहे. याबाबतचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रियाच्या नावावर आहे. त्यांनी २०१९ साली तुर्कीचा १०४ चेंडू आमि १० विकेट राखून विजय मिळवला होता. दुसऱ्या क्रमांकावर ओमान असून त्यांनी फिलिपिन्सवर १०३ चेंडू आणि ९ विकेटनी तर Luxembourg ने तुर्कीवर १०१ चेंडू आणि ८ विकेटनी विजय मिळवला होता.

Related posts