Technology news delete these six apps from your phone immediately they contain malware marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

Malware : सध्याच्या काळात सायबर क्राईमचं (Cyber Crime) प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच तुम्हीही जर अँड्रॉईड (Android) यूजर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. तुमच्या फोनमध्ये मालवेअर (Malware) असू शकतो. फोनमध्ये मालवेअर असण्यामागचं कारण असं आहे की, असे सहा अँड्रॉईड ॲप्स (Android Apps) ओळखले गेले आहेत जे दोन वर्षांपासून गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) आहेत आणि या ॲप्समध्ये मालवेअर आहे. या ॲप्सची ओळख एका सुरक्षा एजन्सीने केली आहे. जाणून घेऊयात यामध्ये कोणत्या अॅप्सचा समावेश आहे तसेच हे कोणत्या पद्धतीने कार्य करते. 

सायबर सिक्युरिटी रिसर्च फर्म ESET ने आपल्या अहवालात असं म्हटलं आहे की, एकूण 12 ॲप्समध्ये Vajraspy नावाचा मालवेअर आहे. यामध्ये आतापर्यंत जरी सहा ॲप्स Google Play Store वरून हटविण्यात आले असले तरी अजूनही सहा ॲप असे आहेत ते प्ले स्टोअरवर अजूनही आहेत. हा मालवेअर कोणत्याही अँड्रॉईड फोनची हेरगिरी करू शकतो.

Google Play Store वर मालवेअर असलेल्या ॲप्सची नावे खालीलप्रमाणे :

  • Privee Talk
  • Let’s Chat
  • Quick Chat
  • Chit Chat
  • Rafaqat
  • MeetMe

हे मालवेअर टाळण्यासाठी काय करावे?

तुमच्या फोनमध्ये यापैकी कोणतेही ॲप असल्यास, ते लगेच डिलीट करा. हा मालवेअर तुमच्या फोनमधील कोणतीही माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवू शकतो. याशिवाय, हे तुमच्या नकळत कॉल रेकॉर्ड करू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करणं गरजेचं आहे. याशिवाय तुमच्या फोनच्या फाईल मॅनेजरमध्ये तुम्हाला कोणतीही संशयास्पद फाईल किंवा फोल्डर दिसले तर ते लगेच डिलीट करा.

एजन्सीनं अँड्रॉइड यूजर्सना सांगितलं आहे की, नेहमी अॅप्स डाऊनलोड करताना काळजी घ्या आणि थर्ड पार्टी अॅप्सपासून सावध राहा. तसेच, कोणतंही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू, त्यासंदर्भातील कमेंट्स नक्की वाचा. यामुळे तुम्हाला अॅपसंदर्भात माहिती मिळण्यासोबतच ते कितपत खात्रीशीर आहे, याची माहिती मिळेल. त्यासोबतच तुमच्या गरजेनुसारच अॅप्सना परवानग्या द्या आणि अनट्रस्टेड वेबसाईट किंवा सोर्सेसना एक्सेस देणं टाळा. कोणतीही वेबसाईट किंवा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिचं डोमेन नेम नक्की चेक करा. जर डोमेन नेम मिसिंग असेल, तर लिंकवर क्लिक करु नका. 

महत्त्वाच्या बातम्या :

Airtel News : Airtel ला टक्कर Jio चा मोफत प्लॅन; कॉलिंग आणि डेटावर मिळणार OTT सबस्क्रिप्शन

अधिक पाहा..

Related posts