Mauris Noronha Bodyguard amarendra mishra arrested in case of abhishek ghosalkar firing case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकर प्रकरणी मॉरिसा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अटक

ठाकरे गटाचा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर वर गोळीबार केल्या प्रकरणांमध्ये एम एच बी पोलिसांनी पिस्टल मालक मिश्राला अटक केली आहे. मिश्राचा पिस्टल मधून आरोपी मॉरिस यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केली होती. मिश्रा मॉरिश याच्याकडे बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. पोलिसांनी दहा ते बारा तासाची चौकशी केल्यानंतर आरोपी मिश्राला अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेची कारवाई आहे. आरोपी अमरेंद्र मिश्राला उद्या सकाळी पोलीस बोरीवली कोर्टात हजर करणार आहेत. अमरिंदर मिश्रा यांच्यावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. ज्या शस्त्राने अभिषेकवर गोळी झाडण्यात आली ते शस्त्र त्याचं होतं. त्याच्याकडून ती मिळविली होती. त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तो मॉरिसचा बॉडी गार्ड म्हणून काम करत असे. शस्त्र सामान्यतः मौरिसच्या कार्यालयात ठेवले जात असे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह या प्रकरणाशी संबंधित विविध लोकांचे जबाब नोंदवले जात आहेत.  मॉरीस आणि अभिषेक ज्या मोबाईलने लाइव्ह गेले तो मोबाईल मॉरीसचा होता. लाईव्ह रेकॉर्ड करण्यासाठी ते ट्रायपॉडवर ठेवण्यात आले होते.

[ad_2]

Related posts