Zeeshan Siddique : मविआत माझ्यावर अन्याय, सध्या काँग्रेसमध्ये, पुढचं माहित नाही : झीशान सिद्दीकी( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबईतल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात १९९९, २००४ आणि २००९ अशा सलग तीन टर्म्स आमदार म्हणून निवडून आलेले बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. येत्या दोन दिवसांत ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण काँग्रेसचा राजीनामा का दिला, या प्रश्नावर थेट उत्तर देणं सिद्दिकींनी टाळलं. प्रत्येक घरात मतभेद होतात, पण त्याची वाच्यता बाहेर करायची नसते, काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात असं सिद्दिकी यांनी म्हणाले. गेली ४८ वर्ष ज्या पक्षात होतो, तो पक्ष सोडताना दुःख तर होणारच, असंही ते म्हणाले. दरम्यान, बाबा सिद्धिकी यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार झीशान सिद्धिकी यांनी मात्र काँग्रेसमध्येच राहणार स्पष्ट केलं आहे.</p>

Related posts