Pune Crime Shocking incident of shooting at partner after financial dispute in Aundh area of Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol Murder Case) झालेल्या दिवसाढवळ्या हत्येनंतर सुरु झालेला बंदुकीचा थरकाप सुरुच आहे. कोथरूडनंतर आता पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल ढमाले अस आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

औंधमधील ज्युपिटर चौकातील प्रकार 

गोळीबार करण्यात आलेला पार्टनर आकाश जाधव या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. औंधमधील ज्युपिटर चौकात हा प्रकार घडला. याच चौकात आकाश जाधवचे ज्वेलरी शॉप होते. हे शॉप त्याने अनिल ढमालेला चालवण्यासाठी दिले होते.  मात्र दोघांमधे गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या व्यवहारावरुन वाद सुरु होते. 

धावत्या दुचाकीवरुन मागून गोळी झाडली

आज (10 फेब्रुवारी) आकाशने अनिल ढमालेला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही एकाच दुचाकीवरून बँकेत जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिल ढमालेनं दुचाकी चालवत असलेल्या आकाशवर मागून गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर त्याने पळ काढला. पळ काढल्यानंतर तो एका रिक्षात जाऊन बसला. रिक्षात बसल्यानंतर अनिलने रिक्षाचालकाला पुणे स्टेशनच्या दिशेने रिक्षा नेण्यास सांगितले. रिक्षातून थोडं अंतर गेल्यानंतर रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या अनिल ढमालेनं स्वतःच्या सुद्धा डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली. 

शरद मोहोळची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या 

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठला आहे. पोलिस यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही? इथपर्यंत हा प्रवास येऊन पोहोचला आहे. कोयता गँगने घातलेली दहशत संपत नसतानाच कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या कोथरुडमध्ये हत्या करण्यात आली. यानंतर सुरु झालेल्या गोळीबाराचा थरार अजून सुरुच आहे. काल (9 फेब्रुवारी) पोलिस बंदोबस्त असतानाही निखिल वागळे यांची गाडी चारवेळा हातात मिळेल ते फेकून भाजप कार्यकर्त्यांनी फोडल्याचा प्रकार घडला. या पुण्यातील घटना ताज्या असतानाच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार करून गंभीर जखमी केले. दोन दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांची मोरोस नोरोन्हाने त्याच्याच कार्यालयात बोलवून हत्या केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts