IND vs AUS U19 WC 2024 Final Live Harjas Singh hits his first fifty of the tournament

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs AUS U19 WC 2024 Final Live :  अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. राज लिंबानीने काॅनस्टॅसला बाद टीम इंडियाला पहिला धक्का दिला. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी डिक्साॅन आणि वेईबगन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. अखेर डिक्साॅनला नमन तिवारी दुसऱ्या स्पेलमध्ये बाद करत टीम इंडियाल वापसी करून दिली. वेईबगनला सुद्धा नमन तिवारीने बाद केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2024 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळवला जात आहे. 

ऑस्ट्रेलियाचा ‘सरदार’ टीम इंडियाला नडला!

यानंतर हरजस सिंग आणि रायन हिक्स यांनी 66 धावांची भागीदारी संघाचा डाव सावरला. हरजस सिंगने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूंचा सामना करत 54 धावा केल्या. हरजसच्या या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दोनशेचा टप्पा पार करता आला. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला तर कांगारूंनी पाकिस्तानला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत पाच वेळा अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अशा स्थितीत आज उदय सहारनचा संघ करंडक जिंकण्यासाठी षटकार मारणार आहे.

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. भारतीय संघ 2024 अंडर-19 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाने आतापर्यंत पाच वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे. ब्लू ब्रिगेडने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने तीनवेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. 

अंतिम फेरीत भारताचा वरचष्मा

अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनदा अंतिम फेरीत भिडले आहेत. टीम इंडियाने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे. आता उभय संघांमध्ये तिसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत पाचवेळा अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. याशिवाय टीम इंडिया दोन वेळा उपविजेतेपदावरही आली आहे. अशा स्थितीत आज भारतीय संघाला विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद मिळवायचे आहे.

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts