Who Is Akash Deep Here Know His Stats Records Ind Vs Eng Test Series Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Akash Deep Stats & Records : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये 15 फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. पाच सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. त्यामुळे राजकोट कसोटी (Rajkot Test) दोन्ही संघासाठी महत्वाची ठरणार आहे. अखेरच्या तीन कसोटी सामन्यासाठी नुकतीच भारतीय संघाची निवड करम्यात आली. भारतीय चमूमध्ये वेगवान गोलंदाज आकाश दीप (Akash Deep) याला संधी देण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भन्नाट कामगिरी करणाऱ्या आकाशदीप याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. म्हणजे, प्लेईंग 11 मध्ये आकाश दीप याला संधी मिळण्याची शक्यात आहे. आकाश दीप याला आवेश खानच्या जागी संधी मिळाली आहे. आकाश दीप आता जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांच्यासोबत भारतीय गोलंदाजीची धुरा संभाळणार आहे. 

सहा महिन्यांत वडिलांना आणि भावाला गमावले – 

बिहारमधील छोट्या गावातून सुरु झालेला आकाश दीपचा प्रवास सोपा नव्हता. त्याने 16 व्या वर्षी वडिलांना गमावले होते, त्यानंतर सहा महिन्यात भावाचेही निधन झाले होते. अतिशय कठीण परिस्थितीतून आकाश दीप याने स्वत:ला सिद्ध केलेय.  वडील आणि भावाला गमावल्यानंतर आकाश दीप याने बहिणीसोबत दिल्ली गाठली. तेथूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये क्लब क्रिकेटमध्ये नशीब अजमावले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळला. क्रिकेटसाठी आकाशदीप याला घरचं नव्हे तर राज्याही सोडावे लागले. बिहार क्रिकेट असोशिएशनवर बॅन लागले होते, त्यामुळे आकाश दीप याने पश्चिम बंगालमध्ये जाऊन नशीब अजमावले.  

आकाश दीपचं करिअर कसं ?

आकाश दीप आयपीएलमध्ये आरसीबी संघाचा सदस्या आहे. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेस्ट ऑफ इंडिया आणि पश्चिम बंगालकडून खेळला आहे. आकाश दीप याने 29 फर्स्ट क्लास सामन्यात 3.04 च्या इकॉनमीने 103 विकेट घेतल्या आहेत. या युवा गोलंदाजाने एकाच डावात पाच विकेट घेण्याचा कारनामा चार वेळा केला आहे. एका सामन्यात 10 विकेट घेण्याचा पराक्रम एकदा केला आहे. आकाश दीप याने 28 लिस्ट ए सामनेही खेळले आहेत.  त्यामध्ये 42 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय 41 टी 20 सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत. 27 वर्षीय आकाश दीप याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताच्या वनडे संघातही स्थान मिळाले होते. पण पदार्पण करु शकला नाही. आता इंग्लंडविरोधात आकाश दीप कसोटीमध्ये पदार्पण करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठऱणार आहे.  

आणखी वाचा :

India vs England 3rd Test : पाच वर्षांनंतर होतोय सामना, राजकोटमध्ये टीम इंडियाचा कसाय रेकॉर्ड?

[ad_2]

Related posts