( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 12 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तुम्ही लांबच्या प्रवासाला जाणार आहे. वाहने जपून वापरा. मित्रांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. व्यवसायात चढ-उतार असेल. कुटुंबात आज तुमच्याशी वाद होणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आजचा दिवस अनावश्यक गर्दीने भरलेला असणार आहे. तुमचं मन अशांत असेल. तब्येतीत घट जाणवेल. व्यवसायात मोठे नुकसान होणार आहे. कुटुंबातील प्रिय व्यक्तीबद्दल दुःखद बातमी मिळणार आहे. पत्नीशी मतभेद होऊ शकतात.
मिथुन (Gemini Zodiac)
आज तुमचा दिवस चांगला असणार आहे. जुनी प्रलंबित कामं आज पूर्ण होणार आहे. तब्येतीत चढ-उतार जाणवलेल. व्यवसायात आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही काही नवीन काम सुरू करु शकता. कुटुंबात शुभ होणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यात तुम्हाला आज यश मिळणार आहे. तब्येत ठीक राहणार आहे. व्यवसायात मोठी भागीदारी करु शकणार आहात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. कुटुंबात नवीन पाहुणे येणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येणार आहे. तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आज तुम्हाला यश मिळणार आहे. तब्येत ठीक राहणार आहे. कुटुंबात शुभ कार्ये होणार आहे. परस्पर मतभेद दूर होणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस काही चढ-उतारांसह जाणार आहे. आज तुमचं आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. कोणत्याही कोर्ट पार्टीच्या कामात तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल. विरोधी वर्ग सक्रिय होणार आहे. आज व्यवसायात मोठी जोखीम घेऊ नका नाही तर नुकसान होईल. कुटुंबात वाद निर्माण झाल्यावर शांत राहण फायद्याच ठरेल.
तूळ (Libra Zodiac)
आज तुम्ही काही खास कामासाठी बाहेर जाणार आहात. वाहने वापरताना काळजी घ्या. आज तुम्हाला व्यवसायात नुकसान सोसावा लागेल. कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे. पत्नीशी संबंध चांगले होणार आहेत.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. तुमची नियोजित कामं पूर्ण होणार आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाणार आहात. मन प्रसन्न असणार आहे. आज तुम्हाला नवीन कामाची जबाबदारी मिळणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. जर तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळणार आहे. आज तुम्ही एखाद्या जुन्या प्रसिद्ध व्यक्तीला भेटणार आहात. अडकलेले पैसे परत मिळणार आहे.
मकर (Capricorn Zodiac)
आज तुमचा दिवस निरुपयोगी धावपळीत गुंतून जाणार आहे. आज तुम्ही वादात अडकण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांच्या षड्यंत्राचे शिकार होण्याची भीती आहे. तब्येतीत चढ उतार दिसणार आहे. व्यवसायात नुकसान सहन करावा लागणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस समस्यांनी भरलेला असणार आहे. आज तुम्ही न्यायालयीन वादात अडकण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यवसायात तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधक तुमच्या विरोधात कट करणार आहे. व्यवसायात आज कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्ही काही मोठ्या समस्येपासून मुक्त होणार आहात. कोर्ट केसेसमध्ये विजय मिळणार आहे. व्यवसायात नफा मिळणार आहे. नातेवाईक आणि मित्रांकडून आर्थिक सहकार्य मिळणार आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)