Maharashtra NCP Politics marathi news Musaddik Inamdar Return to NCP said I will stay with Tatkare until my last breath( प्रगत भारत । pragatbharat.com)

NCP Politics : रायगड (Raigad) जिल्ह्यातील म्हसळा येथील व्यवसायिक तसेच सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे मुसद्दीक इनामदार (Musaddik Inamdar) यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांची अचानक भेट घेतली, त्यावेळी त्यांनी आपली नाराजी दूर करत पुन्हा एकदा आपण सुनिल तटकरे यांच्या सोबतच शेवटच्या क्षणापर्यंत काम करू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. त्यामुळे विरोधकांना आता मोठा धक्का बसला आहे

इनामदारांनी अचानक स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसपासून ठेवले अलिप्त

मुसद्दीक इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) एकेकाळचे विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून काम करत होते. मात्र मधल्या काळात त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पासून स्वतःला अलिप्त ठेवले होते, यानंतर श्रीवर्धन मतदार संघातील इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पाभरे येथील कोंकण सीप या मिनरल वाटर कंपनीचे उदघाटन त्यांनी त्यांच्या हस्ते केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेक ठिकाणी चर्चांना उधाण आल्याचं चित्र होतं 

विरोधकांना मोठा धक्का

याचाच फायदा घेत शिवसेनेने म्हसळा शहरात अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेत बाईक रॅली देखील काढली होती यामध्ये अनेक तरुणांसोबत मुसद्दीक इनामदार देखील सामील झाले होते. याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला होता, मात्र आता संपूर्ण मतभेद बाजूला ठेवत त्यांनी पुन्हा एकदा श्रीवर्धन येथे खासदार सुनील तटकरे यांची अचानक भेट घेत आपली नाराजी दूर करत पुन्हा एकदा आपण सुनिल तटकरे यांच्या सोबतच शेवटच्या क्षणा पर्यंत काम करू असं आश्वासन त्यानी यावेळी खासदार तटकरेंना दिलं. त्यामुळे विरोधकांना आता मोठा धक्का बसला आहे

मुसद्दीक इनामदारांचे तटकरेंना वचन 

मुसद्दीक इनामदार यांनी राष्ट्रवादी घरवापसी केली असून इनामदार यांनी थेट सुनील तटकरेंची भेट घेतली. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत मी सुनील तटकरे यांच्यासोबतच राहीन असे वचन देखील दिले. गेल्या काही काळात तटकरेंशी मतभेद झाल्यामुळे इनामदार तटकरेंपासून दूर होते, राजकीय मतभेद बाजूला ठेवत शरद पवार यांची साथ सोडून सुनील तटकरे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मुसद्दीक इनामदार यांनी घेतला आहे. नाराजी दूर करत पुन्हा सुनील तटकरे यांच्यासोबत मी सक्रिय राहणार असल्याचंही इनामदार म्हणालेत.

रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकीय हालचाली वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बालेकिल्ला असल्याचं बोललं जात असतानाच भाजपने देखील कंबर कसली आहे. भाजपने देखील श्रीवर्धन येथे सभा घेत सुनील तटकरे यांना थेट आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या अनंत गीते यांच्यानंतर आता सुनील तटकरे यांचा रायगडावरून कडेलोट करून ही लोकसभा जिंकणार असल्याचे आव्हान भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नुकतेच दिले आहे. यावर सुनील तटकरेंनी रायगड जिल्ह्यामध्ये जे काही मोजके तीन-चार लोक माझ्याविरोधात सातत्याने बोलत आहेत, त्यांची नोंद भाजपकडून घेतली जाईल असं म्हटंलय. अशातच आता राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक मुसद्दीक इनामदार यांनी पक्षात घरवापसी केल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

हेही वाचा >>>

रायगडमध्ये कडवं आव्हान, राजकीय कडेलोट करण्याची भाषा; सुनील तटकरेंचं भाजप नेत्यांना चोख प्रत्युत्तर

अधिक पाहा..

Related posts