ashok chavan resignation left congress and join bjp soon sanjay raut criticized bjp maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut मुंबई : काँग्रेस पक्षाच्या (Congress)  प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनामा देणे आणि तो राजीनामा जर का शंकरराव चव्हाण यांच्या सुपुत्रांनी दिला असेल, तर याचा अर्थ मुलनं आईला नाकारलं असा तो होईल. काँग्रेस (Congress) ही अजरामर असलेली म्हातारी आहे. ती कधीही मरणार नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे कुठे गेले, याबद्दल त्यांनी अजून पर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे एवढं खळबळ करण्याचे कोणतेही कारण नाही. अशोक चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य काँग्रेस (Congress) पक्षात गेले आहे. आज अशोक चव्हाण जे काही आहेत ते काँग्रेस पक्षामुळेच आहेत. त्यामुळे ते कुठेही जाणार नाही, असा आम्हाला विश्वास असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले.  

जलसिंचन घोटाळ्याप्रमाणे आदर्श घोटाळा पवित्र

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते बोलतांना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आदर्श भ्रष्टाचार घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकण्यासाठी जंगजंग पछाडले होते. आता जर भारतीय जनता पक्षाला जलसिंचन घोटाळ्या प्रमाणे आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असेल तर आम्ही देखील पाहू पुढे काय होतं ते. मात्र अशोकरावांवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते असे करणार नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले. 

 कालपर्यंत अशोकराव चव्हाण आमच्यासोबतंच होते. काल जागा वाटप संदर्भातील महाविकास आघाडीच्या बैठकीला देखील ते उपस्थित होते. मराठवाड्यातील काही जागांसाठी त्यांची आग्रही भूमिका होती. त्याच्यामुळे ते आमच्यातच आहेत, अशी मी आशा बाळगतो. पण जरी कोणाला वाकडी पावले टाकायचे असतील तर बघू पुढे काय होतं ते. अशा शब्दात संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांचं पहिलं ट्विट

आज सोमवार, दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी मी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts